Election
Election Agrowon
ॲग्रो विशेष

Ramtek Market Committee Election : रामटेक बाजार समितीची निवडणूक तेरा वर्षांनंतर

Team Agrowon

Nagpur News : उच्च न्यायालयाने बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रामटेक बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार आहे.

रामटेक बाजार समितीमध्ये १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात सहकारी संस्थांसाठी सर्वसाधारण सात पदे, महिला राखीव मतदार संघासाठी दोन, विमुक्‍त जातीसाठी १, मागासर्वीय राखीव मतदार संघासाठी १ असे ११ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे.

२४३ मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावतील. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाचे २, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघाचे १, आर्थिक दुर्बल मतदार संघाचे १ असे एकूण ४ पदे आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात एकूण ५०५ मतदार आहेत.

अडतिया व्यापारी मतदार संघाचे दोन पदे असून यात एकूण २२५७ मतदार आहेत. मापाडी-हमाल मतदार संघाकरिता एक पद असून यात ५१ मतदार आहेत. पणन प्रक्रिया सहकारी संस्था मतदार संघाचे एक पद असे एकूण १९ संचालक निवडणूक द्यावयाचे आहेत.

रामटेक बाजार समितीचे उत्पन्न अधिक असल्याने या बाजार समितीवर सत्तेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. दरम्यान अंतिम यादी व चिन्ह वाटप २१ एप्रिलला होणार आहे. २८ एप्रिल रोजी मतदान झाल्यावर लगेच तीन दिवसांच्या आत मतमोजणी होईल.

२०१० नंतर पहिल्यांदाच निवडणूक

रामटेक बाजार समितीची निवडणूक २०१० नंतर होत आहे. सध्या समितीवर प्रशासक असून रामटेक बाजार समितीला ‘अ’ दर्जा मिळाला आहे.

दीड कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न या बाजार समितीचे आहे. त्यामुळेच या बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT