Election Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani APMC Election : परभणीतील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सर्व ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला.

सोमवार (ता. २७) ते सोमवार (ता. ३) नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकारण्यात येतील. ता. २८ आणि ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येईल असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

२०२३ ते २०२८ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, ताडकळस या ११ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सोमवार (ता. २७) ते सोमवार (ता. ३) या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. ता २० एप्रिल पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. ता.२१ एप्रिल रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल.

ता.२८ एप्रिल रोजी परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, गंगाखेड, पूर्णा, ताडकळस या ८ बाजार समित्यांसाठी मतदान होईल तर ता. २९ रोजी मतमोजणी होईल. ता. ३० एप्रिल रोजी पालम, सोनपेठ, पाथरी या ३ बाजार समित्यांसाठी मतदान घेऊन मतमोजणी केली जाईल.

जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी उमेशचंद्र हुसे, संजय अब्दगिरे, डी. डी. पठाण, अशोक राठोड आदी निवडणूक प्रक्रियेचे नियोजन करत आहेत.

बाजार समिती निहाय मतदार संख्या

बाजार समिती- सहकारी संस्था- ग्रामपंचायत - व्यापारी - हमाल- एकूण

परभणी- १०२९ - ९७५- ९९५- ४३७- ३४३७

जिंतूर - ५९८ - ८४९- ६४ - २७- १५३८

बोरी - १९५- २९६- १०३- ७२- ६६६

सेलू - ६२७- ६५५ - १८७- ५७३- २०४२

मानवत - ४५१- ४१२- २९२ - ३५२- १५०७

पाथरी - ४२२- ४३५ - १३४ - २९७- १२८८

सोनपेठ - ३२२ - ३५१ - १८५- ६१- ९१९

गंगाखेड - ४५४ - ७०६- ५४०- ५१५- २२१५

पालम- ६११ - ५२०- ११५- १३० - १३७६

पूर्णा - ६४५- ४६७- ३२१- २०६ - १६३९

ताडकळस - २८१ २६१ - ११८ - ८०- ७४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT