Eknath Khadse Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Khadse : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात एकनाथ खडसेंना १३७ कोटींचा दंड, अडचणी कायम

Investigation of Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत आले असून त्यांनाअवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात १३७ कोटींच्या दंडाची नोटीस आली आहे.

Swapnil Shinde

Jalgaon News : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची एक झाली दुसरी, दुसरी झाली तिसरी, असा चौकशींचा ससेमिरा काही पाठ सोडेना. मागील आठवड्यात भोसरी जमीन गैरव्यवहारात जामीन मिळाल्यानंतर आता महसूल विभागाने १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचीही समावेश आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत खडसे कुटुंबियांनी सातोर शिवारात १ लाख १८ हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. राष्ट्रीय महामार्गासाठी बेकायदेशीरपणे एक लाख 18 हजार ब्रास गौणखनिज उत्खनन करण्यात येऊन तब्बल ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आला आणि शासनाची फसवणूक झाली,' असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता.

त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती. त्यांनी याप्रकरणाची एसआयटीने चौकशी करत शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर महसूल विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT