Ekalahare Project Agrowon
ॲग्रो विशेष

Ekalahare Project : एकलहरे प्रकल्प बंद न करता होणार पुनर्विकास

Thermal Plant : आगामी काळात नाशिकासाठी वाढवण बंदर महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागणारी वीज आवश्यकता लक्षात घेता एकलहरे केंद्रातून घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

Team Agrowon

Nashik News : आगामी काळात नाशिकासाठी वाढवण बंदर महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागणारी वीज आवश्यकता लक्षात घेता एकलहरे केंद्रातून घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून ती एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे.

एकलहरे औष्णिक केंद्रात ६६० मेगावॉटचा प्रकल्प मंजूर असून वाढविण्याची गरज पूर्ण करण्यासाठी नवीन संच लवकरच उभारण्यात येणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

परळीच्या औष्णिक वीज निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली आहे. मात्र नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीज केंद्रात नवीन संचाला मान्यता कधी देण्यात येणार हा प्रश्‍न सरोज अहिरे यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता.

यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाढवण बंदरासाठी विजेची आवश्यकता असून, त्यासाठी एकलहरे प्रकल्पाची मदत घेता येईल का यासाठी समिती स्थापन होणार असल्याचे सांगितले. प्रकल्प बंद न करता पुनर्विकास होईल. त्यामुळे एकलहरे येथे नवीन संच उभारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

येथील जुने संच पुनर्विकसित करून तो प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे. वीज केंद्रातील कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिरे यांना विधानसभेत दिली होती.

एकलहरे येथे ६६० मेगावॉट प्रकल्प मंजूर आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा. यासाठी पाठपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करून एकलहरे येथील औष्णिक केंद्रातील नूतन संच विकसित करावा यावा, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार; पूर्व विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता

Farm Road Issue : शेतरस्त्यांची दयनीय अवस्था

Inspirational Rural Story: एक स्वप्न... गणेश आणि सपनाचं!

Turmeric GI : वसमत हळद जीआय टॅगसाठी ई-पीक पेरा नोंद आवश्यक

Crop Advisory: कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

SCROLL FOR NEXT