Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : आठ हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

Waiting For Crop Insurance : शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी आढळून आल्याने त्यांना अजूनही पीकविम्याची मदत मिळालेली नाही.

Team Agrowon

Yavatmal News : शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी आढळून आल्याने त्यांना अजूनही पीकविम्याची मदत मिळालेली नाही.

या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्रुटी दूर करून मदतीसाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, तालुकास्तरावर बैठकांचे नियोजन केले आहे.

पीकविम्याचा हप्ता जमा करूनही भरपाई मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेपासून दुरावले होते.

त्यामुळेच यंदा केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.

गेल्या हंगामात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तत्काळ पीकविमा कंपनी व कृषी विभागाला नुकसानीची माहिती दिली.

कृषी विभागाने पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला होता. त्यानंतर जिल्ह्यासाठी पीकविमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मदतीचे वाटप शेतकऱ्यांना केले जात आहे. मात्र, जवळपास आठ हजार शेतकऱ्यांचे खाते त्रुटीत आले आहेत. शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकले आहेत. काही शेतकऱ्यांचे आयएसी क्रमांक व इतर काही त्रुटी आढळल्या आहेत.

त्यामुळे आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीकविमा योजनेची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले शेतकरी मदतीसाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेची मदत मिळावी, यासाठी आता कृषी विभागाने कंबर कसली आहे.

मदत वाटपासाठी तालुकानिहाय मेळावे घेण्याचे नियोजन कृषी विभागाचे आहे. या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना बोलावून त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांकडून पीकविम्याकरिता पूर्वसूचना दाखल झाल्या होत्या. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत प्राप्त झाली आहे. त्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे खाते तांत्रिक त्रुटीत आले आहे. त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
प्रमोद लहाळे, कृषी अधीक्षक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT