Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची आठ टक्के पेरणी

Rabi Crop : जिल्ह्यात ८.९४ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवार अखेर (ता. १६) झाली आहे. चारा टंचाईच्या दृष्टीने मका लागवड करण्याकडे कल शेतकऱ्यांचा राहणार आहे.

Team Agrowon

Satara News : किमान परतीचा पाऊस येईल या आशेवर संथगतीने का होईना रब्बी पेरणीची कामे सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८.९४ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवार अखेर (ता. १६) झाली आहे. चारा टंचाईच्या दृष्टीने मका लागवड करण्याकडे कल शेतकऱ्यांचा राहणार आहे.

जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. परतीचाही पाऊस न झाल्याने रब्बी पूर्व कामांना गती आलेली नाही. रब्बी हंगामासाठी ठेवलेल्या शेतजमीन कामे सुरू झाली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पेरणी कामे सुरू झाली आहेत. सध्या रब्बी ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात जास्त पेरण्या होतात.

रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १३ हजार २०९ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) १९ हजार ५८ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ८.९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खटाव तालुक्‍यात सर्वाधिक नऊ हजार ४४४ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ५३५ हेक्‍टर असून, त्यापैकी १७ हजार ८९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार २०९ हेक्‍टर असून, एक हजार ८८७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT