Hasan Mushrif  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Bhavan : कृषी भवनासाठी आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्न करणार

Team Agrowon

Kolhapur News : कृषी विभागाची सर्वच कार्यालये एकत्र असणाऱ्या प्रस्तावित कृषी भवनासाठी आवश्यक तो निधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शनिवारी (ता.२१) दिले.

वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतिगृह इमारतीचे उद्‌घाटन केल्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा बावडा येथील वसतिगृहाचे उद्‌घाटन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर शेतकरी मेळावा झाला.

विकास पाटील, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, भाग्यश्री पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. आमदार सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

या वेळी बसवराज बिराजदार उमेश पाटील यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले. अरुण भिंगारदेवे यांनी आभार मानले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी नामदेव परीट, बसवराज मास्तोळी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT