Mahesh Kharade Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation : म्हैसाळचे पाणी ६५ गावांत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार

District President of Swabhimani Farmers Association : जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.

Team Agrowon

Jat News : जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश माळी, दुदाप्पा बिराजदार, युवा आघाडी अध्यक्ष भिमांना बिराजदार, उपस्थित होते.

श्री. खराडे पुढे म्हणाले,‘‘लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही. ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जत तालुका पिढ्यान् पिढ्या दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील प्रत्येक गावात शेतीला पाणी पोहचवणे डाळींब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देणे कडधान्यांचा हमी भाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

याशिवाय गेली अनेक वर्षे जत तालुक्याचा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडविणे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून देणे, दुधाला हमी भाव मिळवून देणे, या प्रश्नांना प्राधान्य देवून या निवडणुकीत जत तालुक्यात मतदारांसमोर जाणार आहे. "तालुकाध्यक्ष रमेश माळी म्हणाले,‘‘आम्ही घराघरापर्यंत जावून आमचे काम आणि विचार सांगू. मतदार आम्हाला साथ देतील.’’

भिमा बिराजदार, पक्षाचे अध्यक्ष दुंदाप्पा बिराजदार, ज्ञानेश्वर बमनली, दर्याप्पा भजबलकर, विठ्ठल कुंभार, सागर चव्हाण, बाबासाहेब कोळी आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीला शिवानंद बिराजदार, सुशांत बिराजदार, सागर पुजारी, सिद्धू बिराजदार, भैरप्पा माळी, शहाजी साळे, आबा गावडे, पिंटू लगोटे, आदी सहशेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT