Mhaisal Irrigation : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘म्हैसाळ’च्या कालव्यांना येणार पाणी

Agriculture Irrigation Scheme : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत वगळता अन्य कालव्यांना पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा लागणार आहे.
Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation Scheme Agrowon
Published on
Updated on

Sangli News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत वगळता अन्य कालव्यांना पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी नोंदवायला विलंब केल्यामुळे आवर्तनाचे नियोजन उशिरा झाले आहे.

आता धरणातून पाणी सोडून घेतले जाईल आणि त्यानंतर अन्य कालव्यांतून पाणी सुरू केले जाईल, असे धोरण आहे. ‘शेवटापासून प्रारंभ’ धोरणानुसार पाणी वितरणाच्या धोरणाने जतचा फायदा होईल, मात्र मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांना त्याचा फटका बसणार आहे.

म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रात पाण्याची मागणी नोंदवणे आणि पाणी सोडण्याचे नियोजन करणे, यातील विसंवाद हा वर्षानुवर्षे चालत आला आहे. शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज दिले जात नाहीत, हे वास्तव आहे. पाणी तळाला गेले आणि पिके वाळायला लागली की मग शेतकरी जागे होतात, त्यानंतरच अधिकारी शिवारात जातात, मग अर्ज जमा केले जातात, या वर्षी तेच घडते आहे.

Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी

मात्र यंदाची स्थिती वेगळी आहे. पाऊस कमी झाला आहे. टंचाईची स्थिती आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. ऊस लबवर तुटला आहे. अन्य पिकांना पाण्याची गरज आहे आणि या काळातच ‘शेवटापासून प्रारंभ’ धोरणानुसार आधी जतला प्राधान्य देत तो कालवा सुरू करण्यात आला आहे. अन्य कालवे सुरू कधी करणार, याबाबत स्पष्टता नाही, कारण, अधिकृत मागणी नाही. या स्थितीत शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे.

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परिस्थितीची पूर्ण माहिती घेत यंत्रणा कामाला लावली.

परंतु, या घडीला अन्य कालव्यांचे आवर्तन सुरू करण्यासाठी चांदोलीतून पाणी सोडणे गरजेचे आहे. ती प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि पाच-सात दिवसांत आवर्तन सुरू केले जाईल, असे प्राथमिक चित्र आहे. साहजिकच, म्हैसाळ योजनेच्या अन्य कालव्यांना पाणी यायला आता जानेवारी महिना उजाडणार आहे.

Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation Scheme : म्हैसाळ विस्तारित योजनेची १०२८ कोटींची कामे सुरू

चांदोलीत पुरेसे पाणी

या वर्षी दुष्काळी स्थिती असली तरी सुदैवाने चांदोली धरण शंभर टक्के भरले होते. शिराळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा तो फायदा झाला. परिणामी, म्हैसाळ योजनेला कपातीचा फारसा परिणाम जाणवणार नाही, पुरेसे पाणी मिळू शकेल.

आता आवर्तन वेळेत सुरू होणे गरजेचे आहे. अन्यथा, कालव्यात पाणी येताच पंप सुरू होतील आणि पाणी पुढे सरकणार नाही, ही देखील वर्षानुवर्षांची समस्या आहे.

म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तातडीने आम्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लवकर आता आवर्तन सुरू केली जातील, त्यात अडचण येणार नाही.
चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता
कालव्यांना पाणी यायला हवे होते. आठवडा उशीर झाला तर पिके अडचणीत येतील. मागणी अर्जाची सक्ती असू नये. पाणी आले की शेतकरी पैसे भरतात.
परशुराम एकुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, एरंडोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com