Banana Export Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cluster : नांदेडमध्ये केळीचे क्लस्टर होण्यासाठी प्रयत्नशील ; खासदार प्रा. रवींद्र चव्हाण

Nanded Banana Cultivation : केळीला योग्य दर मिळवून देण्यासाठी जळगावच्या धर्तीवर नांदेडमध्येही केळीचे क्लस्टर उभे राहावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी दिले.

Team Agrowon

Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यात मुदखेड, अर्धापूर, भोकर, नांदेडसह इतर तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील केळी उत्पादन वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि केळीला योग्य दर मिळवून देण्यासाठी जळगावच्या धर्तीवर नांदेडमध्येही केळीचे क्लस्टर उभे राहावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी दिले.

मुदखेड तालुक्यातील बारड येथे माजी आमदार कै. साहेबराव बापू यांच्या निवासस्थानी खासदार चव्हाण यांनी केळी उत्पादकांशी संवाद साधला. या वेळी माजी सभापती सुनील देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, ॲड. संदीप देशमुख, कैलास गोडसे, प्रा. संदीपकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रल्हाद सोळुंके, माजी सभापती संजय बेळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, महंमद गौस, लक्ष्मण देवदे, माधव हामंद, अनुराग बारडकर आदी उपस्थित होते.

खासदार चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्यातून देशाअंतर्गत व बाहेरही केळी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. परंतु आजतागायत केळीचे क्लस्टर झाले नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. आपण स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जवळून अनुभवतो.

अर्धापुरी केळीसाठी प्रसिद्ध असलेला नांदेड जिल्हा आता आधुनिक पद्धतीने केळी घेत आहे. या भागात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज, शेतीसाठी भक्कम रस्ते इत्यादी पायाभूत सुविधांबरोबरच केळीचे क्लस्टर उभे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे, हक्काचे दाम मिळवून देऊ.’’ पीकविम्यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हनुमंत राजेगोरे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केळी पीकविमा, रोपनिर्मिती, कोल्ड स्टोरेज आदी सुविधांबाबत चर्चा करीत नांदेड जिल्ह्यात केळीचे क्लस्टर उभे करावे, अशी मागणी खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

Dairy Farming: पशुपालनात दैनंदिन व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT