Soil Erosion Agrowon
ॲग्रो विशेष

जमिनीची धूप रोखण्यासाठी डीजीटल मॅपींग तंत्र

मातीचा काही सेंटीमीरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. त्यामानाने जमिनीची धूप होण्याचा वेग कितीतरी जास्त आहे.

Team Agrowon

जमिनीची धूप (Soil Erosion) होण्याचा वेग पाहता २०५० पर्यंत पृथ्वीचा वरच्या थराला ९० टक्के धोका असल्याचा इशारा अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजेच एफ.ए.ओ. ने दिला आहे. एफ.ए.ओ. ने दिलेल्या इशाऱ्यानूसार जगामध्ये दर पाच सेकंदाला पृथ्वीवरिल मातीचा सर्वात वरचा थर झपाट्याने कमी होत आहे. मातीचा काही सेंटीमीरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. त्यामानाने जमिनीची धूप होण्याचा वेग कितीतरी जास्त आहे. हे प्रमाण लक्षात घेता जगाला भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. संयुक्त राष्ट्र संस्थेने गेल्या दशकभरात ग्लोबल स़ॉइल पार्टनरशीप बरोबर करार केलेल्या देशांना या दृष्टीने उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.

जमिनीची धूप होण्याचा वेग पाहता २०५० पर्यंत पृथ्वीचा वरच्या थराला ९० टक्के धोका असल्याचा इशारा अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे. एफ.ए.ओ. ने दिलेल्या इशाऱ्यानूसार जगामध्ये दर पाच सेकंदाला एका फुटबॉलच्या खेळपट्टी एवढा पृथ्वीवरिल मातीचा सर्वात वरचा थर झपाट्याने कमी होत आहे. मातीचा काही सेंटीमीरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हे प्रमाण लक्षात घेता भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. संयुक्त राष्ट्र संस्थेने गेल्या दशकभरात ग्लोबल स़ॉइल पार्टनरशीपबरोबर करार केलेल्या देशांना या दृष्टीने उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे.

डीजीटल मॅपींग तंत्राचा उपयोग


ग्लोबल स़ॉइल पार्टनरशीप ने डीजीटल मॅपींग तंत्राचा उपयोग करुन मीतीविषयी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. या माहितीचा उपयोग जमिनीची धूप होण्याची कारणे शोधण्यासाठी होऊ शकेल. तसेच धूप झालेल्या जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्यासाठी होणार आहे.

शालेय शिक्षणात जमिनीचे आरोग्य आणि जमिनीची धूप या विषयांना महत्व देऊन याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. असे आवाहन एफएओने केले. त्यामुळे मातीच्या आरोग्याची माहिती आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुलभपणे होइल.

आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष आणि जागतिक मृदा दिन यासारख्या मोहीम राबवून मातीबद्दल तरुणांमध्ये जागरूकता वाढवून त्याचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT