PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Educational Loan : ‘पीडीसीसी’कडून शैक्षणिक कर्ज ७८८ विद्यार्थ्यांना मंजूर

PDCC Bank : विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा बॅंकेने शैक्षणिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. मागील एक वर्षात तब्बल ७८८ विद्यार्थ्यांना १२२ कोटी ८५ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे.

Team Agrowon

Pune News : विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा बॅंकेने शैक्षणिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. मागील एक वर्षात तब्बल ७८८ विद्यार्थ्यांना १२२ कोटी ८५ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे.

गेल्या वर्षी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला. यात देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखापर्यंत कर्ज देण्यास सुरुवात केली.

यापूर्वी हे कर्ज १५ लाख रुपये मिळत होते. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळेल. या आधी हे कर्ज २५ लाखांपर्यंत मिळत होते. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर दहा टक्के आहे. नियमित कर्ज, व्याज परतफेड करणाऱ्या विद्यार्थ्यांना चार टक्के व्याज परतावा देण्यात येत आहे.

पगार तारणावर ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जात आहे. पूर्वी त्याची मर्यादा चार लाख रुपये होती. २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षामध्ये ७०२ शैक्षणिक कर्जदार विद्यार्थ्यांना चार टक्के व्याजदराने एक कोटी २७ लाख ६२ हजार रुपयांची व्याज सवलत दिली आहे.

पीडीसीसी बॅंकेकडून शेती कर्जाव्यतिरिक्त गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज दिले जाते. त्याचा अनेक नागरिक फायदा घेत आहेत. विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन देशांतर्गत ३० लाख रुपयांपर्यंत, तर परदेशातील शिक्षणासाठी ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे.
डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पीडीसीसी बॅंक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: राज्यात उन्हाचा चटका कायम; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

Rainfall Deficit Impacts: कमी पावसाचा बाजरी पिकाला फटका

Sugarcane Farmers Protest: पुणे- बंगळूर महामार्गावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ठिय्या, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन

Fodder Shortage Planning: चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन

Milk Fat: दुधातील फॅट वाढविण्यासाठी योग्य आहार

SCROLL FOR NEXT