Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Farming : एकात्मिक शेतीतून आर्थिक सक्षमता

Economic Empowerment : शेतमालाचे मूल्यवर्धन व दुग्ध व्यवसायासारखा जोडधंदा अशाप्रकारच्या एकात्मिक शेती प्रणालीचा अंगीकार झाल्यास गावात निश्‍चितच समृद्धी नांदेल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी व्यक्‍त केला.

Team Agrowon

Nagpur News : शेतमालाचे मूल्यवर्धन व दुग्ध व्यवसायासारखा जोडधंदा अशाप्रकारच्या एकात्मिक शेती प्रणालीचा अंगीकार झाल्यास गावात निश्‍चितच समृद्धी नांदेल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी व्यक्‍त केला.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अंमलबजावणी होणाऱ्या अनुसूचित जाती विकास कृती आराखड्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. शाश्‍वत शेतीमध्ये पशुधनाची भूमिका या विषयावर हे प्रशिक्षण पार पडले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रसाद पुढे म्हणाले, ‘‘अनुसूचित जाती विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत पशुधन व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करता येणार आहे. त्याकरिता माफसूचे सहकार्य अपेक्षित असून त्या माध्यमातून गावस्तरावर एकात्मिक शेती प्रणालीचे मॉडेल राबविता येईल. हे मॉडेल गावाच्या आर्थिक समृद्धीचे निमित्त ठरणार आहे.’’

माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी शेतकरी समूहाच्या माध्यमातून एकत्रितपणे दुग्ध व्यवसाय केल्यास त्यातून निर्माण होणारी सांघिक व्यावसायिकता या विषयावर माहिती दिली. विदर्भात दरडोई शेतीक्षेत्र कमी आहे. या स्थितीत सामूहिकस्तरावर दुग्ध व्यवसायाचा प्रयोग फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले.

दुधाळ जनावरे, पौष्टिक चारा उत्पादन या विषयावर त्यांनी तांत्रिक माहिती दिली. डॉ. जयंत मेश्राम यांनी अनुसूचित जाती संवर्गाकरिता असलेल्या शेतीपूरक अनुदान योजना याविषयी मार्गदर्शन केले. पशुपालनाला चालना देण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात ३१८ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे ६३६ शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

सीआयसीआरकडून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेतील जैव नियंत्रक प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या जैविक बुरशी निर्मिती केंद्राला प्रशिक्षणार्थ्यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. या वेळी डॉ. शैलेश गावंडे, डॉ. निळकंठ हिरेमानी यांनी शेतकऱ्यांना जैविक बुरशीची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Malnutrition Crisis: कोवळी पानगळ चिंताजनक

Krishi Samruddhi: नाव मोठं, लक्षण खोटं

Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन

Banana Variety: ‘बीएआरसी’कडून केळीची ‘म्युटंट’ जात विकसित

CCI Procurement: ‘सीसीआय’ची दररोज १ लाख गाठी कापूस खरेदी

SCROLL FOR NEXT