Dr. Rajendra Singh Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : नदीबाबतची पर्यावरणीय समज आवश्यक

Dr. Rajendra Singh : राज्य सरकार या अभियानाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. यंत्रणांनी अभियान राबविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतानाच अधिकाधिक लोकसहभागही मिळवावा.

 गोपाल हागे

Akola News : पर्यावरणातील नदीचे स्थान अनन्यसाधारण आहे. प्रत्येकात त्याबाबतची समज व अंतर्दृष्टी विकसित होणे आवश्यक आहे. ‘चला जाणूया नदीला’ अभियानातून नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडूया व अभियान यशस्वी करूया, असे आवाहन अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. राणा यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १३) आढावा बैठक झाली, या वेळी ते बोलत होते. राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग, श्री. कुलकर्णी, अभियानाचे समन्वयक अरविंद नळकांडे, प्रमोद सरदार, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक रामास्वामी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुधीर राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की राज्य सरकार या अभियानाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. यंत्रणांनी अभियान राबविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतानाच अधिकाधिक लोकसहभागही मिळवावा. नदीला आपण आईची उपमा दिलेली आहे.

मात्र तिच्याशी व्यवहार चुकीच्या पद्धतीने करतो आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती करून नदी अमृत वाहिनी करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात नदी महोत्सव, तसेच ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणे ही आनंदाची बाब आहे. या मोहिमेत जलबिरादरीचा पूर्ण पाठिंबा आहे. नद्यांचे प्रदूषण थांबविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी आपला नदीशी व्यवहार कसा आहे, हे तपासणे आवश्यक आहे.

पर्यावरण व नदीवर प्रेम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर प्रामुख्याने उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने नदी किनाऱ्यावर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशा सूचना राजेंद्र सिंह यांनी या वेळी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT