Ashadhi Wari 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : सर्व मानाच्या पालख्यांचे १ जुलैपर्यंत जिल्ह्यात आगमन

Palakhi Sohala 2025 : यंदाची आषाढी एकादशी ६ जुलै (रविवारी) आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे प्रस्थान ता. २ रोजी झाले असून सध्या अकोला (जि.बुलडाणा) येथे पालखी मुक्कामी आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या अभंगाप्रमाणे लवकरच सकल साधू- संत सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सर्वप्रथम कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल रुखमाई संस्थानची पालखी पाथरी (ता. बार्शी) येथून २७ जूनला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. १ जुलैपर्यंत सर्व मानाच्या पालख्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

यंदाची आषाढी एकादशी ६ जुलै (रविवारी) आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे प्रस्थान ता. २ रोजी झाले असून सध्या अकोला (जि.बुलडाणा) येथे पालखी मुक्कामी आहे. २८ जून रोजी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथून ही पालखी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे तर २९ जूनला गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे. २९ व ३० जून हे सोलापूर शहरातील मुक्काम असून १ जुलैला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

मानाच्या दहा पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत नामदेव, श्री विठ्ठल रखुमाई संस्थान, कौंडिण्यपूर (रखुमाईचे माहेर), संत चांगावटेश्वर देवस्थान (सासवड), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर, जि. नगर) या पालख्यांचा समावेश आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमणार आहे.

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (मुक्काम, रिंगण सोहळे)

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर येथे मुक्काम होणार आहेत. तर पुरंदावडे, खुडुस, ठाकूरबुवा समाधी (तोंडले बोंडले), बाजीराव विहीर (वाखरी) येथे गोलरिंगण होणार आहे. तर भंडीशेगाव, वाखरी येथे उभे रिंगण सोहळे होणार आहेत.

श्री संत तुकाराम महाराज पालखी (मुक्काम, रिंगण सोहळे)

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी व पंढरपूर येथे मुक्काम असून अकलूज येथे गोल रिंगण तर माळीनगर, बाजीराव विहीर (वाखरी) येथे उभे रिंगण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT