Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखीचे २३ जूनला पंढरपूरला प्रस्थान

Sant Sopankaka Palakhi : श्री संत सोपानकाका आषाढी वारी पालखी सोहळा पंढरपूरकडे २३ जून रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून दुपारी ११ वाजता प्रस्थान ठेवणार आहे.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Agrowon
Published on
Updated on

Pune News : श्री संत सोपानकाका आषाढी वारी पालखी सोहळा पंढरपूरकडे २३ जून रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून दुपारी ११ वाजता प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा ५ जुलै रोजी वाखरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असल्याचे श्री सोपानदेव समाधी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी यांनी सांगितले.

सासवड येथील देऊळवाड्यातून २३ जून रोजी निघून पिंपळे मार्गे पांगारे येथे मुक्काम होणार आहे. तर २४ जून रोजी पालखी परिंचे, वीर मार्गे मांडकी येथे भैरवनाथ मंदिरात मुक्काम, तर २५ जून रोजी जेऊर, नीरा मार्गे निंबूत येथे श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम, तर २६ जून रोजी पालखी सोहळा निंबूत येथून निघून सोमेश्वरनगर येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीवर कोरोनाचे सावट: माळशिरस तालुक्यात २ संशयित रुग्ण आढळले

२७ जून रोजी पालखी सोहळा वडगाव निंबाळकर मार्गे रात्रीचा मुक्कामासाठी कोऱ्हाळे बुद्रुक येथे येईल. २८ जून रोजी पालखी कोऱ्हाळे येथून निघून माळेगाव बुद्रुक शारदानगर मार्गे बारामती येथील शारदा प्रांगण येथे मुक्काम करणार आहे. २९ जून रोजी पालखी पिंपळीमार्गे लासुर्णे येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

३० जून रोजी लालपुरी, कळंब, निमसाखर मार्गे निरवांगी येथे रात्रीचा मुक्काम करून १ जुलै रोजी पालखीचा मुक्काम अकलूज येथे होईल. २ जुलै रोजी बोरगाव, माळखांबी मार्गे पालखी बोंडले येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2024 : विठ्ठल, विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

३ जुलै रोजी बोंडले येथून दुपारी पालखी मार्गस्थ होऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान महाराज यांचा बंधू भेट सोहळा झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी भंडी शेगाव येथे जाईल. ४ जुलै रोजी पालखी वाखरी मुक्कामी असेल, वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे.

५ जुलै रोजी सोहळा पंढरपूर मुक्कामी. पंढरपूर येथील पालखीचा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील तांबड्या मारुती नजिकच्या श्री संत सोपान महाराज पालखी मंडपात राहील. पंढरपूर येथील पाच दिवसांच्या मुक्कामानंतर काला झाल्यावर १० जुलै रोजी दुपारी १ वाजता पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल व १६ जुलै रोजी पालखी सासवड येथे पोहोचेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com