Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली. मेमध्ये झालेल्या पावसाने मशागती लवकर उरकल्यामुळे पेरण्यालाही लवकर सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यंदा मूग, उडीद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा तब्बल मेमधील पावसाची २२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जूनमध्ये मृग जोरदार बरसत असून १३ जूनपर्यंत ४६.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे पेरण्याला लवकर सुरुवात झाल्याने यंदा आतापर्यंत १ लाख २३९ हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
पेरण्याची ही टक्केवारी ९ टक्के आहे. पाऊस सुरुवातीला आला तर मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढते हे ठरलेले आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाला. मेमधील पावसाने मशागती लवकर आटोपल्याने यंदा मूग, उडदाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून आतापर्यंत उडदाची २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तर मुगाची पाच हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
अकोले तालुक्यात रोपवाटिका प्रक्षेत्रावर ४९८ हेक्टरवर भात रोपे तयार करण्यात आली आहेत, चांगला पाऊस झाल्यानंतर भात आवणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ढगाळ हवामान, कमीअधिक पाऊस आहे. यामुळे पेरलेले तसेच लागवड केलेल्या कापसाचे नुकसान होत आहे.
वादळी पावसाने नुकसान
जिल्ह्यात ११ व १२ जून रोजी रात्री वादळी पावसाने फळबागा व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या वादळी पावसाने जिल्ह्यात ५८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी मेमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
पेरणी (हेक्टर) कंसात सरासरी क्षेत्र
भात ः (१८,७४५)
बाजरी ः ८ हजार २५१ (८९,६२९)
मका ः ८ हजार २४२.४० (७७,९९९)
तूर ः १० हजार ७२६ (६४,५८५)
मूग ः १४ हजार ९६३ (५१,९८०)
उडीद ः २५ हजार ३१ (६७,५९५)
भुईमूग ः ४४ (६,६००)
सोयाबीन ः १९ हजार ६२७ (१,७८,५०६)
कापूस ः १२ हजार ८१६ (१,५५,३२९)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.