Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Department Of Revenue : मंडल, तलाठी कार्यालयांतही आता होणार ‘ई- ऑफिस’

E-Office Systeam : जिल्ह्यातील उपविभागीय, तसेच तहसील कार्यालयांपाठोपाठ आता मंडल व तलाठी कार्यालयांतही ‘ई- ऑफिस’ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल अकोला जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला : जिल्ह्यातील उपविभागीय, तसेच तहसील कार्यालयांपाठोपाठ आता मंडल व तलाठी कार्यालयांतही ‘ई- ऑफिस’ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल अकोला जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. कामकाजात गतिमानता, अचूकता, पारदर्शकता आणण्यासाठी व नागरिकांना

जलद सेवा मिळण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होणार आहे.

सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला अद्ययावत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी असा सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील विविध कार्यालयांत ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते.जिल्हाधिकारी कार्यालयापासून या उपक्रमाची सुरुवात झाली, तसेच उपविभागीय कार्यालये आणि तहसील कार्यालयांतही ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

त्यानंतर आता जिल्ह्यातील मंडल कार्यालये व तलाठी कार्यालयांतही ‘ई-ऑफिस’ अंमलात आणण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. त्याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात दहा मंडल कार्यालये व ५० तलाठी कार्यालयांत ई- ऑफिस कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने मंडल अधिकारी व तलाठी यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले.

‘महाआयटी’चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना ई-ऑफिसच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले. ई-ऑफिससाठी आवश्यक असलेले शासकीय ई-मेल आयडी नुकतेच राष्ट्रीय सूचना केंद्रांकडून प्राप्त करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयांना ई- ऑफिसद्वारे कामकाज चालविणे शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेकडून ९४९ कोटींचा कर्जपुरवठा

Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर

SCROLL FOR NEXT