Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अर्थसाह्यासाठी दोन लाखांवर शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित

Agriculture Subsidy : राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे.

Team Agrowon

Parbhani News : राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे. परभणी जिल्ह्यातील कापूस व सोयाबीनचे मिळून एकूण ५ लाखावर शेतकरी पात्र आहेत. शुक्रवार (ता. २०) पर्यंत ३ लाख २४ हजार ९६९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले तर २ लाख ४० हजार ९१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित होते.

आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीचा वापरासाठी १ लाख १८ हजार शेतकऱ्यांकडून संमतिपत्र किंवा नाहरकत पत्र येणे बाकी होते तर संबंधित शेतकऱ्यांनी गावाशी संबंधित कृषी सहाय्यकाकडे नाहरकत पत्र द्यावे. ई केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रवि हरणे यांनी केले आहे.

गतवर्षी (२०२३) बाजारभाव कमी झाल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबद्दल राज्यशासनाकडून खरिपातील ई-पीकपाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी व सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परिगणना करुन अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. २० गुंठे पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये तर २० गुंठेपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.

अर्थसहाय्याची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. रक्कम वितरणापूर्वी आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून वैयक्तिक संमतिपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक आहे.

परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये एकूण २६४ कृषी सहाय्यक आहेत.कापूस उत्पादक १ लाख २९ हजारावर व सोयाबीन उत्पादक ४ लाख ३६ हजार मिळून एकूण ५ लाख ६५ हजार शेतकरी आहेत. कपाशीच्या ९८ हजार ३०९ व सोयाबीनच्या ३ लाख ४९ हजार ३२४ मिळून एकूण ४ लाख ४७ हजार ३४५ शेतकऱ्यांनी (७२.०६ टक्के) नाहरकत पत्र दिले आहेत. नाहरकत प्रमाणपत्र देऊन ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

परभणी जिल्हा कापूस, सोयाबीन अर्थसाहाय्य स्थिती

तालुका ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी प्रलंबित

परभणी ५३७०८ ४५२९७

जिंतूर ४९१९४ ३९७६८

सेलू ४०७७४ २९३२३

मानवत २४६२५ १८०९५

पाथरी २७६४२ १९८५२

सोनपेठ २२३११ १६५०५

गंगाखेड ३८८९१ २९९१७

पालम ३३३४० २०८७५

पूर्णा ३४४८४ २१२८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Competition: ‘अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे’

Soil Mining Scam: वाडा तालुक्यात चिंचघरमध्ये कोट्यवधींचा माती घोटाळा

Farmer ID: ‘फार्मर आयडी’अभावी साताऱ्यातील तीन हजार शेतकरी मदतीपासून वंचित

Latur APMC: अडत बाजारात हमीभावानेच शेतीमालाची खरेदी करा

Agrowon Podcast: शेवगा पोचला २० हजारांवर,हरभरा दबावातच,संत्री आवक कमी,ज्वारीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT