Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच

Agriculture Subsidy : सुरुवातीला हे अनुदान प्रारंभी ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते. परंतु ते जमा न झाल्याने १० सप्टेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितल्या गेले.
Cotton and Soybean
Cotton and SoybeanAgrowon
Published on
Updated on

Washim News : २०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानावर उपाय म्हणून राज्य शासनाने या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला होता.

या निर्णयाचा कारंजा तालुक्यातील ९२ हजार ८०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यात ११४११ कापूस उत्पादक आणि ७०८५५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. अनुदान मिळण्यासाठी शेतकरी सातत्याने प्रतीक्षा करीत आहेत.

Cotton and Soybean
Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे गायब

सुरुवातीला हे अनुदान प्रारंभी ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते. परंतु ते जमा न झाल्याने १० सप्टेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितल्या गेले. परंतु त्यालाही आठवडा उलटला. तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन व कापसाचे अनुदान जमा झाले नाही.

त्यामुळे सोयाबीन व कापूस अनुदान जमा होण्याचा मुहूर्त हुकल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे. ही रक्कम सोयाबीन व कापूस उत्पादक असलेल्या आणि ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. परंतु अद्याप पर्यंत यापैकी अनेक शेतकऱ्यांना हे अर्थसाह्य मिळाले नसल्याने अद्याप प्रतीक्षा कायम आहे.

Cotton and Soybean
Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

२०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने आता कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य मिळणार आहे. खरीप २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादकांची संख्या ९२ हजार ८०० आहे.

२०२३ घ्या खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पन्नातील घटीने बसला व त्यानंतर कमालीचे भाव कोसळले. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. परंतु अद्याप ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसून तारीख पे तारीख दिली जात आहे. प्रशासनाने हा मदत निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.
- गजानन लकडे, शेतकरी, शहा, ता. कारंजा, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com