ST Buses Agrowon
ॲग्रो विशेष

ST Buses Revenue : दिवाळीत रोज लालपरीच्या उप्तन्नात तीन कोटींची वाढ

ST Mahamandal : एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवासी संख्या पाच लाखांनी वाढल्याने नियमित उत्पन्नाच्या तुलनेत दररोज ३ कोटींची वाढ झाली आहे.

Team Agrowon

Mumbai News : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट धावली आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत योजनेमुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवासी संख्या पाच लाखांनी वाढल्याने नियमित उत्पन्नाच्या तुलनेत दररोज ३ कोटींची वाढ झाली आहे.

दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणे हे गृहीत धरून एसटी महामंडळाने काही दिवस अगोदरच नियोजन केले आहे. दरवर्षी दिवाळी सुट्यांनिमित्त अनेकांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे.

त्यामुळे दिवाळी सणापूर्वी तसेस त्यानंतर मोठ्या संख्येने प्रवाशांनी एसटीला पंसती दिली आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदार भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरतात. मात्र, यंदा एसटीच्या विविध योजनांमुळे खासगी वाहतूकदारांना अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

तिकीट दरात सवलत दिल्‍याने महिलावर्गाकडून एसटी प्रवासाला पसंती दिली जात आहे. त्‍याचबरोबरच ज्‍येष्‍ठांसाठी, विद्यार्थ्यांनाही सवलती देण्यात आल्‍याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हंगामी भाडेवाढ रद्द झाल्याने फटका

एसटी महामंडळाने दरवर्षी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्यात येते. गेल्यावर्षी देखील करण्यात आली होती. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा शंभर कोटींचा महसूल बुडणार आहे.

लक्ष्मीपूजनापूर्वी संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या भागात प्रवाशांची गर्दी असते. विशेषतः पुणे प्रदेशात सर्वाधिक प्रवासी संख्या असते. परंतु, भाऊबजच्या दुसऱ्या दिवशी प्रवासी संख्येत प्रचंड वाढ होते. विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात प्रवासी जास्त असतात.
शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), एसटी महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

Sugarcane Season 2024 : ‘बळीराजा’चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

SCROLL FOR NEXT