Anil patil Agrowon
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : अवकाळग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देणार

Cabinet Decision : अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने १८ जिल्ह्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे.

Swapnil Shinde

Relief Unseasonal Rains : राज्‍यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज मुंबईत राज्‍य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. नुकसानग्रस्‍त भागातील शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येणार असून, मदतीसाठीची दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीन हेक्‍टर करण्यात आली असल्‍याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने १८ जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्‍यात सुमारे ९९ हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करुण्यात आले आहेत. या नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असून, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तसेच भरपाईसाठी दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीन हेक्‍टर करण्यात आली असल्‍याची माहिती अनिल पाटील यांनी दिली.

हेक्‍टरी मिळणार ६ हजार ८००

एनडीआरएफच्या निकषानुसार सध्या हेक्‍टरी ६ हजार ८०० रुपये इतकी नुकसानभरपाई सरकारतर्फे देण्यात येते. ती गेल्या वर्षी दुप्पट केल्‍याने हेक्‍टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात आली होती. तसेच दोन हेक्‍टरची मर्यादा वाढवून तीदेखील तीन हेक्‍टर करण्यात आल्‍याने नुकसानग्रस्‍त शेतकऱ्याला जास्‍त दिलासा मिळू शकणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस

Local Body Elections: ग्रा.पं.वर प्रशासकाचे सावट!

Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून  लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन

Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT