Rain Alert  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Damage : मुसळधारेमुळे फरशी पूल गेले वाहून

Rain Update : मघा नक्षत्राच्या शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या अंतिम चरणातील पावसाने साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी दाणादाण उडवून दिली.

Team Agrowon

Dhule News : मघा नक्षत्राच्या शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या अंतिम चरणातील पावसाने साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी दाणादाण उडवून दिली. ‘सर आली धावून आणि पूल, फरशी, रस्ते गेले वाहून’ अशी अवस्था झाल्याने ककाणी (ता. साक्री) येथील गावठाणमध्ये वाहतुकीचा संपर्क तुटला आहे.

तीच अवस्था म्हसदीहून कमी अंतर असलेल्या नाशिककडे जाणाऱ्या काळगाव रस्त्यावरील पठाडी-चिंच नाल्यावरील पुलाची झाली आहे. परिणामी जुनी फरशी, पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही अवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

यंदा सुरुवातीपासून पावसाने रिपरिप का होईना सातत्य ठेवल्याने ग्रामीण भागातील अनेक उपरस्त्यांची वाट लागली आहे. दुसरीकडे भीज पावसामुळे गावात चिखल तुडवत चालावे लागत आहे. महामार्ग सोडले तर ग्रामीण भागातील इतर जोड रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शिवाय संततधार पावसाने अवस्था आणखीनच बिकट केली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्‍न वाहनचालकांना पडल्याशिवाय राहत नाही.

म्हसदी-काळगाव रस्त्यावर पठाडी-चिंच नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्चून पूल बांधला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करीत फूल बांधल्याची तक्रार काळगाव येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच केली आहे. लाखो रुपये निधी खर्च करीत निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर जोरदार पावसामुळे रस्ते, फरशी व पुलाची वाट लागते. आज सावधगिरीने वाहने मार्गस्थ होत असली तरी अजून पाऊस झाला तर पुलाची अवस्था अजून बिकट होण्याची शक्यता वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.

नव्या गावठाणचा संपर्क तुटला

ककाणी गाव गेल्या काही वर्षांपासून नवीन गावठाणमध्ये स्थिर झाले आहे. बहुतांश ग्रामस्थ शेतातच राहत असल्याने नवीन गावठाणामध्येही वस्ती वाढली आहे.

शुक्रवारच्या धुव्वाधार पावसामुळे नाल्यावरील फरशी वाहून गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Iran Conflict: दोन आठवड्यांची शस्त्रसंधी

Fruit Price Issue: फळपिकांना नाममात्र दर; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Jaggery Market Trade: कोल्हापूर बाजार समितीत गूळ सौद्यात अडथळे कायम

Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Onion Procurement Policy: केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता

SCROLL FOR NEXT