Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : उन्हाच्या तीव्रतेमुळे गावोगावी पाणीप्रश्न ऐरणीवर

Water Issue : नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने एकाच वेळी पाण्याची मागणीही वाढू लागली. त्यामुळे जिल्ह्यात ११ दिवसांत तब्बल ३० टॅंकरची मागणी झाली आहे. जिल्ह्यातील २७३ गावे व ६५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाच लाख ३८ हजार ७६३ नागरिक व दोन लाख जनावरांची तहान २८६ टँकरद्वारे भागविली जात आहे.

एप्रिलमध्येच पाण्याची परिस्थिती अवघड झाल्याने मेमध्ये पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होईल. गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही. तसेच, दिवसेंदिवस उन्हाळा अधिक वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.

जिल्ह्यातील काही गावांना वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली. २९ मार्चअखेर आठवड्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ६ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २२६ वर पोहोचली. १८ एप्रिलला जिल्ह्यातील २३३ गावे आणि ५३५ वाड्या अशा ७६८ ठिकाणी २५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. २९ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २८६ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ६९ टँकर नांदगाव तालुक्यात, तर ४७ टँकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत.

महिनाभरात वाढले ८० टॅंकर

टंचाईचे संकट गडद होत असल्याने महिनाभरात तब्बल ८० टॅंकर वाढले आहेत. २९ मार्चला जिल्ह्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. महिनाभरात म्हणजे २९ एप्रिलला यात तब्बल ८० ने वाढ होऊन ती संख्या २८६ वर पोहोचली आहे. मेमध्ये टॅंकरची संख्या ही चारशे पार होण्याचा अंदाज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तविला.

पाणीपुरवठ्यासाठी १४८ विहिरी अधिग्रहित

दुष्काळग्रस्त असलेल्या ३४ गावांना तसेच ११४ ठिकाणी टॅंकरसाठी १४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाणसाठी ३८, चांदवड ५, देवळा ३५, कळवण १५, मालेगाव ४१, नांदगाव ४, सुरगाणा ४, येवला तालुक्यासाठी ६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

तालुका गाव-वाड्या सुरू टॅंकर

बागलाण ३६ ३५

चांदवड ९३ ३१

देवळा ६२ ३५

इगतपुरी १ १

कळवण १५ -

मालेगाव १२७ ३६

नांदगाव ३४० ६९

नाशिक १ १

सिन्नर १५९ १७

सुरगाणा १५ ८

येवला ७९ ४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT