Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Production : कमी पावसामुळे हरभऱ्याचा उतारा कमी

Chana Farming : कमी पावसाने यंदा हरभऱ्याला कमी उतारा मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा हिरमोड झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यात ‘हरभऱ्या’च्या मळणीला वेग आला आहे. मोहोळ तालुक्यात रब्बी हंगामात चार कृषी मंडलांत एक हजार ९३८ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. परंतु कमी पावसाने यंदा हरभऱ्याला कमी उतारा मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा हिरमोड झाला आहे.

मोहोळ तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत ऊस पीक राहील का नाही, याची खात्री नसल्याने अनेकांनी ऊस रोटरून टाकला. पर्यायी पीक म्हणून अनेकांनी हरभऱ्याची निवड केली.

ज्या शेतकऱ्याला पाण्याची खात्री आहे, त्याने गहू केला, कारण हरभऱ्यापेक्षा गव्हाला पाणी जादा लागते. हरभरा लागवड किंवा पेरणी केल्यानंतर जमीन चांगली काळी असेल तर दोन पाण्यातच हरभरा निघतो, शिवाय या पिकाच्या पाल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व उत्तम खत होते. सध्या या हरभऱ्याची काढणी करून त्याच्या मळणीला वेग आला आहे

हरभरा लागवड व पेरणी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्याला रासायनिक खताची मात्रा देऊन फवारणी केली आहे, जेणेकरून उत्पादन वाढावे, हा त्या मागचा हेतू. मात्र मळणी केल्यानंतर अपेक्षित उत्पादन होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. शिवाय मळणीचे व मजुरांचे दर वाढल्याने हा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नसल्याची स्थिती आहे.

कुरुल मंडलात सर्वाधिक पेरणी

मोहोळ तालुक्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ३ हजार ९४४ हेक्टर इतके आहे. तर मंडलनिहाय झालेल्या पेरणीत मोहोळ मंडलात ४१३ हेक्टर, पेनूर मंडलात ३३० हेक्टर, कुरुल मंडलात ६५२ हेक्टर आणि नरखेडला ५४३ हेक्टर इतकी पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT