Chana Cultivation : या तंत्राने करा हरभरा लागवड

Chana Sowing : हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक आहे. या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

Chana Crop : हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक आहे. या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

जमिनीची मशागत

पेरणी करायच्या अगोदर जमीन लागवडीसाठी तयार करावी. जमीन २ ते ३ वेळा वखराच्या कुळवाच्या पाळ्या मारून घ्याव्या. जेणे करून जमीन भुसभुशीत होईल.

सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो)

जय संजीवनी - ५ किलो

त्यानंतर वरील घटक शिंपडुन पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावी.

(वरील सर्व घटकांचे प्रमाण प्रति एकर प्रमाणे दिले आहे.)

वाणाची निवड

वियज, जाकी - ९२१८, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, के. डी. एस - ७२६ किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही बियाणे तुम्ही निवडू शकता.

प्रति एकरी बियाण्यांचे प्रमाण

हरभरा लागवडीसाठी सरासरी भारी जमीन असल्यास बियाणे १५ ते २० किलो प्रति एकर आणि हलकी जमीन असल्यास २० ते २५ किलो प्रति एकर बियाणे वापरावे.

बिज प्रक्रिया

बियाणे पेरणीपूर्वी १ लिटर पाण्यात खालील घटकांमध्ये भिजवून रात्रभर वाळू द्यावे.

ह्युमिक जेल - १०० ग्रॅम

व्ही-कार्बो ५० - ५० ग्रॅम

पेरणीसोबत पहिली खताची मात्रा

ओलिताखालील व भारी जमीन असल्यास दोन ओळींमधील अंतर २ फूट व दोन बियाण्यामधील अंतर ८ ते १० इंच प्रमाणे असावे. कोरडवाहू व हलकी जमीन असल्यास दोन ओळींमधील अंतर १.५ फूट ठेवावे.

पेरणी सोबत खताची पहिली मात्रा द्यावी.

२०:२०:००:१३ – १ बॅग (५० किलो)

शक्ती गोल्ड - १० किलो

हाय पॉवर - १० किलो

(वरील घटकांचे प्रमाण प्रति एकर प्रमाणे दिले आहे.)

Salam Kisan
Linseed Cultivation : सुधारित तंत्राने करा जवसाची लागवड

पहिली फवारणी

पेरणी पासून १६ ते २० दिवसात पहिली फवारणी करावी.

खालील घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपानुसार दिले आहे.

ह्युमिक जेल - २५ ग्रॅम

चॅलेंजर – ५ मिली

व्ही-ठोको - २० ग्रॅम

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

दुसरी खताची मात्रा

दोन ते तीन फुले दिसल्यास खालील खत शिंपडून पिकाला पाणी द्यावे.

युरिया - २० - ३० किलो

खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

(वरील खतांचे प्रमाण प्रति एकर प्रमाणे दिले आहे.)

Salam Kisan
Chana Cultivation : खामगाव तालुक्यात हरभरा लागवड वाढणार

दुसरी फवारणी

खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसा नंतर दुसरी फवारणी करावी.

खालील घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपानुसार दिले आहे.

वरद चमत्कार- ५ मिली

फ्लॉवर स्ट्रॉंग – २५ मिली

व्ही-जजमेंट - २५ मिली

व्ही-प्रोफेन सुपर - २५ मिली

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. ही फवारणी झाल्यानंतर ४० - ५०% घाटे तयार होई पर्यंत पाणी देऊ नये. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार दुसरी फवारणी पुन्हा करावी.

तिसरी फवारणी

१५ - २०% घाटे तयार झाल्यानंतर तिसरी फवारणी करावी.

खालील घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपानुसार दिले आहे.

अमिनो जेल - २५ ग्रॅम

व्ही-कॉम्बो - २५ ग्रॅम

व्ही-टोन - २५ मिली

व्ही-प्रोक्टीन - १५ ग्रॅम

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १० मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार तिसरी फवारणी पुन्हा करावी.

रोगनियंत्रण

पिकावर तांबेरा रोग दिसून आल्यास खालील घटकांची फवारणी करावी.

खालील घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपानुसार दिले आहे.

झिंकोवीट- २५ ग्रॅम

फेरोवीट- २५ ग्रॅम

प्रत्येक फवारणीसोबत पॉवर सेव्हर (स्टिकर) - १५ मिली प्रति पंप वापराने अनिवार्य आहे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार वरील घटकांची फवारणी पुन्हा करावी.

काढणी

झाडाची पाने लालसर तपकिरी होऊन गळतात तेव्हा पीक कापणीसाठी तयार होते. विळ्याने पिकाची कापणी करुन काढणी केलेले पीक पाच ते सहा दिवस उन्हात वाळवावे. व्यवस्थित सुकल्यानंतर काठीने बडवून किंवा बैलांच्या पायाखाली तुडवून मळणी करावी.

---------------

(सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com