Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Drought: मराठवाड्यातील दुष्काळ पाच वर्षांत संपविणार

Watergrid Scheme: ४० हजार कोटींच्या ‘मराठवाडा वॉटरग्रीड’ योजनेची अंमलबजावणी ५ वर्षांत पूर्ण करून गावोगाव पाणी पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

Team Agrowon

Nanded News: महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने आणली होती. परंतु त्यानंतर सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने खोडा घातला. आता परत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केली.

नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या शंखनाद सभेत सोमवारी (ता. २६) अमित शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, माजी आमदार अमर राजूरकर, विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहा म्हणाले, की ४० हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांशी योजना फडणवीस पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना कार्यान्वित केली होती. परंतु त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने ही योजना बंद केली. यानंतर पुन्हा फडणवीस पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यामुळे ही योजना पाच वर्षांत पूर्ण करू, असेही शहा म्हणाले.

शहा यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. देशाच्या सीमा तसेच देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी भारताने पाकिस्तान मधील आतंकवादाचे अड्डे नष्ट करून भारताकडे कोणी वाकड्या डोळ्यांनी पाहणार नाही असा जगाला संदेश दिल्याचे ते म्हणाले. सीमेपलीकडील आतंकवाद संपविण्यासोबतच देशाअंतर्गत नक्षलवादही ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण संपून देश नक्षलमुक्त करणार, असे ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सिंदूर’चे स्वागत केले असते

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगात पाठवून भारताची बाजू मांडण्यात येत आहे. परंतु या सर्वपक्षीय खासदार प्रतिनिधी मंडळाला उद्धव ठाकरे यांची सेना ‘बारात’ म्हणत असल्याबद्दल शहा यांनी नाराजी व्यक्त केली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पाकिस्तान विरोधातील कारवाईचे समर्थन केले असते, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT