Sangli Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Fund : वाई, खंडाळा तालुक्यांसाठी ४० कोटी रुपयांचा दुष्काळ निधी

Drought Crisis : खरीप हंगामात अल्प पावसामुळे पिके वाया गेली होती. याचा सर्वाधिक फटका वाई व खंडाळा तालुक्यांना बसला होता.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पावसामुळे पिके वाया गेली होती. याचा सर्वाधिक फटका वाई व खंडाळा तालुक्यांना बसला होता. त्यानुसार शासनाने या दोन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता.

आता या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी ४० कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. या दोन तालुक्यांतील एक लाख २० हजार ३९२ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे, तर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांना दुष्काळाच्या सवलती मिळणार आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पावसामुळे अनेक तालुक्यांतील गावांत खरीप पिके वाया गेली. परिणामी, कमी पर्जन्यमान झालेल्या तालुक्यात मोठे नुकसान झाले, तर काही तालुक्यांत पिकांची उगवण झाली; पण पावसाअभावी करपून गेली होती.

त्यावेळी राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत गंभीर परिस्थिती झाली होती. त्यामुळे या तालुक्यांत दु‌ष्काळ जाहीर करण्यात आला होता. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित तालुक्यांनी आवाज उठविल्याने उर्वरित तालुक्यात दुष्काळी उपाययोजना व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यांना दुष्काळ निधीपोटी ४० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT