Maharashtra Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought Condition : दुष्काळात महाराष्ट्र होरपळतोय! शेजारील कर्नाटकला जाग आली पण महाराष्ट्राला कधी येणार?

sandeep Shirguppe

Maharashtra Karnataka Drought Condition : महाराष्ट्राला लागून असणाऱ्या कर्नाटक सरकारने १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. यानंतर सरकारने तातडीने अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणीसाठी दाखल झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसौध येथे महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकात १० सदस्य आहेत. ते चार दिवस राज्यातील स्थानिक अधिकाऱ्यांसह दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक सरकार तातडीने पावले उचलत शेतकऱ्यांना मदतीसाठी कामाला लागले आहे. परंतु कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्रात याहीपेक्षा भयानक अवस्था असूनही दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही.

महाराष्ट्रातील ९ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत तर काही तालुक्यांना दुष्काळाच्या झळा सप्टेंबरपासून बसत आहेत. राज्यातील सर्वाधिक सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अत्यंत तीव्र आहेत.

तर दुसरीकडे कर्नाटक सरकारकडून केंद्रीय पथकाला राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली. केंद्राकडे सहा हजार कोटी रुपये मागणीचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे, कृषी मंत्री चेलुवरायस्वामी, सहकार मंत्री केएन राजन्ना, फलोत्पादन मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन या बैठकीत सहभागी होते.

या तुलनेत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ ते ४४ टक्के इतका कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याचा चार महिन्यांचा प्रवास संपवत मान्सून राज्यातून ४ किंवा ५ रोजी परतीला निघत आहे. यंदा राज्यातील आठ जिल्हे सप्टेंबरअखेर अवर्षणाच्या छायेत आहेत. तर सांगलीसह मराठवाड्यातील शेकडो गावांना हजारो टँकरद्वारे पाणीपूरवठा सुरू आहे. मागच्या चार महिन्यात काहीच जिल्हे ५० टक्क्यांवर गेली आहे परंतु अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊसच झाली नाही.

दरवर्षी किमान ८ ते १० जिल्हे अतिवृष्टी, तर १५ ते १८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असतो. महाराष्ट्रातील कोकण वगळता मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १२ टक्के कमी, मराठवाडा ११ टक्के, तर विदर्भ उणे २ टक्के इतका कमी पाऊस झाला आहे.

जून महिन्यापासून सांगली जिल्ह्यात ४४, सातारा ३७, सोलापूर ३०, बीड २१, धाराशिव २१, हिंगोली २४, जालना ३३, अकोला २३, अमरावती २७ दुष्काळाच्या छायेत आहेत. तर सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी देण्याची सोय सुरू आहे.

कर्नाटकात आलेलं केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत दुसरी बैठक घेणार आहेत. यानंतर ९ ऑक्टोबरला नवी दिल्लीत जाऊन अहवाल सादर करणार आहेत. यानुसार गावांच्या निकषानुसार त्यांना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याउलट महाराष्ट्रात खरीप हंगाम धोक्यात येऊनही कोणतात ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT