River Linking Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

Team Agrowon

Nashik News : दिंडोरी तालुक्यात नार-पार उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यातून वाहून जाणारे पाणी थेट करंजवण धरणामध्ये प्रवाही वळण योजनेंतर्गत नेण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातील तूट भरून निघण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यातील अंबड व पळसविहीर परिसरात मुबलक पाणी उपलब्ध होईल. यामुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् होणार आहे.

यासाठी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत प्रवाही वळण योजनेसाठी दिंडोरी तालुक्यातील अंबड येथील खासगी जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात तशी नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्ववाहिनी नदीमध्ये वळविण्याबाबतची ही योजना आहे. मौजे अंबड व पळसविहीर गावाचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय सादर करण्यात आला आहे. मौजे अंबड शिवारातील संबंधित बाधित गटाची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.

मौजे पळसविहीर गावातील संबंधित गटाची संयुक्त मोजणी नियोजित आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव बाधित होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची येथे आवश्यकता नाही. नगररचना विभागाकडून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची येथे मूल्यांकन बैठक होऊन त्याचा दर निश्चित केला जाईल. त्यानंतर भूसंपादनासाठी जमीन खरेदी केली जाईल. जमीन आदिवासी असल्यामुळे त्यासाठी दर निश्चिती ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच होईल.

दिंडोरी तालुक्यातील अंबड शिवारात त्या गावाजवळ नार-पार उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यावर संबंधित योजना प्रस्तावित आहे. यामध्ये धरणाचे पाणलोट क्षेत्र ०.६७० चौरस किलोमीटर एवढे असून, ते मुक्त पाणलोट क्षेत्र आहे. पाणीसाठा पावसाळ्यात गोदावरी खोऱ्यात २१० मीटर लांबीच्या उघड्या चारात सराद्वारे प्रभावी पद्धतीने वळविण्याचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे.

भूसंपादन

बुडित क्षेत्र (खासगी) ३.४४ हेक्टर

इतर (खासगी) २.९४ हेक्टर

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

पाणलोट क्षेत्र ०६७० चौ. किमी

पाणी उपलब्धता ३६.२६ दलघफू

गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणारे पाणी ३५.०३ दलघफू

स्थानिक वापरासाठी पाणीसाठा ४.७० दलघफू

सिंचन क्षेत्र ५१ हेक्टर

प्रवाही वळण योजना अंबड यासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दर निश्चित झाल्यावर भूसंपादन खरेदी प्रक्रिया सुरू होईल.
- एम. बी. ढोकचौळे, कार्यकारी अभियंता, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभाग, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

SCROLL FOR NEXT