Honey Export  Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Export : मध निर्यातीचे प्रमाण वाढले : डॉ. सचिन सुरोशे

Dr. Sachin Suroshe : मधमाशीपालन व्यवसाय देशाचा आर्थिक कणा मजबूत करू शकतो, असे मत भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सचिन सुरोशे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Baramati News : कृषी विज्ञान केंद्रात होणारे संशोधन हे मधमाशी पालकांसाठी फायदेशीर होईल, त्या दृष्टीने करावे. कोरोनानंतर मध निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फायदा देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी करता होईल. मधमाशीपालन व्यवसाय देशाचा आर्थिक कणा मजबूत करू शकतो, असे मत भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सचिन सुरोशे यांनी व्यक्त केले.

मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प या विषयावर भारतामधील २५ राज्यांमध्ये प्रकल्प राबवण्यात येतो. यासाठी अखिल भारतीय संशोधन परिषदेमार्फत सहा शास्त्रज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने २ ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारतामधील पश्चिम विभागातील पाच राज्यांची पंचवार्षिक आढावा बैठक कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. सुरोशे हे बोलत होते.

या वेळी डॉ. वाय. एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एच. सी. शर्मा, अखिल भारतीय समन्वीत मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्पाचे माजी प्रकल्प समन्वयक डॉ. राजकुमार ठाकूर, स्कॉस्टच्या कृषी विद्याशाखाचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. पी. अॅब्रोल, डॉ. के. लक्ष्मी राव, एम.आर. श्रीनिवासन, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, डॉ. मिलिंद जोशी,

शास्त्रज्ञ डॉ. कुमारनाग, डॉ. धीरज शिंदे, अल्पेश वाघ, प्रशांत गावडे, आशिष भोसले, अक्षय कुंभार, सचिन क्षीरसागर उपस्थित होते. यामध्ये इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूरचे राजमोहिनीदेवी कृषी संशोधन केंद्र, अंबिकापूर, छत्तीसगड, कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्र उम्मेदगा कोटा राजस्थान, नवसारी कृषी विद्यापीठ, गुजरात, बांदा कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ उत्तर प्रदेश व कृषी विज्ञान केंद्र, बारामती या केंद्रांनी सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT