Agrowon Diwali Ank Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Dattatray Vane : ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान

Agrowon Diwali Ank :ज्ञान हीच खरी संपत्ती आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आपल्या व समाजाच्या सार्वत्रिक हितासाठीचा विचार म्हणजेच ज्ञान. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना ज्ञानाची लालसा माझ्यात होतीच.

Team Agrowon

डॉ. दत्तात्रेय वने

दैनिक ‘ॲग्रोवन’ सुरू होण्यापूर्वी मोशीच्या कृषी प्रदर्शनात ‘सकाळ’ची टीम शेतकऱ्यांकडून एक प्रश्‍नावली भरून घेत होती. त्यात मी माझे मत पुढीलप्रमाणे लिहिले होते- सध्या मासिक कुणी वाचत नाही, दैनिक कोण वाचेल? कृषी दैनिकासाठी लागणारी माहिती रोजच्या रोज कुठून व कशी मिळेल? आज १८ वर्षांनी मागे वळून पाहताना या दोन्ही प्रश्‍नांचं सार्थ उत्तर मला मिळाले आहे. या साऱ्या प्रवासाचा मी एक साक्षीदारही राहिलो आहे.

ज्ञान हीच खरी संपत्ती आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आपल्या व समाजाच्या सार्वत्रिक हितासाठीचा विचार म्हणजेच ज्ञान. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना ज्ञानाची लालसा माझ्यात होतीच. याच ज्ञानलालसेने सलग तीन वर्षे प्रथम श्रेणीत मी उत्तीर्ण झालो. वैद्यकीय शिक्षण घेताना शेतीशी नाळ जुळलेली होतीच. मानोरीत (ता. राहुरी, जि. नगर) मी दवाखाना सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद होता.

या दवाखान्याने माझ्यासाठी शेतीच्या अथांग ज्ञानसाधनेचे दालन खुले केले. शेती परवडत नाही या सार्वत्रिक चित्राने मी व्यथित झालो. पाणी व्यवस्थापन हा शेतीचा आत्मा आहे. पण त्याकडे झालेले दुर्लक्ष हे शेतीतील तोट्याचे खरे कारण असल्याचे लक्षात आले. शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काही केले पाहिजे ही भावना प्रबळ झाली. त्यातूनच शेती तंत्रज्ञान प्रसाराचा श्रीगणेशा झाला.

माझे शेतीतील प्रयोग व अभ्यास १९९६ पासून सुरू आहे. मात्र त्याची ‘ॲग्रोवन’ने दखल घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा त्याला प्रतिसाद मिळाला. २ ऑक्टोबर २००५ रोजी पहिल्यांदा या दैनिकात माझी मुलाखत छापून आली. या दैनिकाचा वाचक किती सर्वदूर पसरला आहे, त्याची मला त्यामुळे प्रचिती आली.

तेव्हापासून मी या दैनिकासोबत जोडला गेलो आहे. त्यानंतर २००७ मध्ये माझ्या काटेकोर व शाश्‍वत शेतीविषयीच्या प्रयोगांची सविस्तर माहिती देणारी डॉ. वने मॉडेल ही ११ भागांची लेखमाला या दैनिकात प्रकाशित झाली. कृषी विद्यापीठात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आपल्या शेतावर राबविण्यासाठी मी केलेला शास्त्रीय अभ्यास हा त्या लेखमालेचा गाभा होता. या लेखमालेने कहर केला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून फोनचा भडिमार सुरू झाला. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे ॲग्रोवनने ही लेखमालिका पुस्तिकेच्या स्वरूपातही प्रकाशित केली. १७ नोव्हेंबर २००७ रोजी पुणे येथे कृषी प्रदर्शनात नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या हस्ते तिचे प्रकाशन करण्यात आले.

या लेखमालेमुळे राज्यभर माझ्या प्रयोगांची दखल घेतली गेली. त्यानंतर शेती तंत्रज्ञान विस्ताराचा अखंड ज्ञानयज्ञ सुरू झाला. मी हरभरा, गहू, कांदा, सोयाबीन या पिकांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रयोग केले. ते कमालीचे यशस्वी झाले. जमिनीची सुपीकता, पाणी व्यवस्थापन, रोपांची संख्या, प्रति हेक्टरी उत्पादन, निविष्ठांचा कार्यक्षम वापर याबाबतीत मी केलेले प्रयोग शेतकऱ्यांना भावले.

निसर्गाशी जुळवून शेती केली तरच ती शाश्‍वत होते, हे प्राचीन तत्त्वज्ञानाच्या वाचनातून समजले. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते मुबलक प्रमाणात व सहजपणे उपलब्ध आहेत. त्यांचा सम्यक वापर व सुयोग्य व्यवस्थापन हेच शेतीचे बलस्थान. त्यातून डॉ. वने मॉडेल विकसित होत गेले.

मी पिके पारंपरिक निवडली; पण त्यांच्या उत्पादनाची पद्धती पारंपरिक ठेवली नाही. त्याला सुधारित तंत्राची व पाणी व्यवस्थापनाची जोड दिली. या तत्त्वावर आधारित शेती केल्यामुळेच मला यश मिळाले आणि शेती विकासाचा शाश्‍वत मार्ग सापडला. माझ्या प्रयोगांची चार वैशिष्‍ट्ये सांगता येतील ः

- गहू, कांदा, भुईमूग, सोयाबीन, हरभरा यांचे तुषार सिंचनाने व्यवस्थापन व काटेकोर शेती.

- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा समुचित वापर.

- शेतीचा काटेकोर हिशेब, नफ्यातील २५ टक्के बचत, पाणी व्यवस्थापन व कृषी अर्थशास्त्रावर फोकस.

- कुटुंब व शेतीचे स्वतंत्र अर्थशास्त्र, आर्थिक बचत. शेतकऱ्यांचे गट, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून विस्तार कार्य.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT