Leopard  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Cages Funds : ‘डीपीडीसी’तून बिबट्याच्या पिंजऱ्यांसाठी निधी देणार

Special Funds for Forest Department : तातडीने उपाययोजना म्हणून बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल,

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव यासह शिरूर-हवेली या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्याचा वावर वाढला आहे. यातून शेतकऱ्यांवर हल्ल्यासारख्या दुर्घटनाही घडल्या आहेत. याकरिता तातडीने उपाययोजना म्हणून बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल,

त्यानुसार उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वनविभाग अधिकारी महादेव मोहिते यांना दिल्याची माहिती आमदार ज्ञानेश्‍वर कटके यांनी दिली.

मुंबई येथे शिरूर-हवेली मतदार संघातील विविध मुद्यांबाबत आमदार कटके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नुकतेच निवेदन सादर केल्यानंतर तातडीची बाब म्हणून विशेष बैठक घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी निर्देश दिले आहेत. या वेळी वनविभाग, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळणार :

बिबट्यांचे मानवांवर हल्ले वाढत आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत समस्या मांडली. वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी करावी. तसेच बिबट्या निवारा केंद्राची क्षमता तीन महिन्यांत १०० बिबट्यांची करावी. महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा करावा, आदी कामांना मंजुऱ्या देण्याचे निर्देश पवार यांनी दिले असल्याचे कटके यांनी सांगितले.

परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या सूचना वनविभागास देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मेंढपाळांना मोठ्या आवाजाच्या बंदुकांसह विशेष तंबू देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
ज्ञानेश्‍वर कटके, आमदार शिरूर-हवेली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT