Leopard Terror : दररोज बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले

Leopard Attack : दररोज होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनाने शेतीकाम सुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Leopard Terror
Leopard Terror Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : दररोज होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनाने शेतीकाम सुटत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाचोड (ता. पैठण) परिसरातील चार-पाच गावांत बिबट्या दृष्टीस पडून त्याने काही जणांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी धास्तावला आहे. चार दिवसांत चार ठिकाणी बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला.

माहितीनुसार सोमवारी (ता. २५) चार गावांत बिबट्याचे दर्शन होऊन हर्षी (ता. पैठण) शिवारात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. तीन आठवड्यांपासून बिबट्याने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे.

आता इथे--- तर तासभराने दुसऱ्या गावांत त्याचे दर्शन होत असल्याने नेमके बिबटे किती, या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. वन विभागही त्यांस पकडण्यात अजून यशस्वी नाही.

सर्वप्रथम पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने वडजी शिवारात पहिल्या दिवशी दोन वगारांना ठार केले. दुसऱ्या दिवशी एका हरिणीला भक्ष्य बनविले. तिसऱ्या दिवशी ७४ जळगाव येथे बारा वर्षीय मुलीवर हल्ला केला त्यात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर वडजी येथील कापूस वेचणी करणाऱ्या महिलेवर त्याने हल्ला केला. शनिवारी (ता. २३) वडजी येथील बापूसाहेब सरसराव भांड हे दुपारी शेतातून मोटार सुरू करून दुचाकीवरून घरी परतत असताना बिबट्याने त्यांचा पाठलाग केला.

परंतु त्यांनी आरडाओरड करून मोठ्या धैर्याने दुचाकी पळवल्याने व माणसांचा घोळका समोर आल्याने बिबट्या परत फिरला व बापूसाहेब बचावले. तर रात्री बिबट्या थेरगाव-वडजी रस्त्यावर दिसला. काही जणांनी त्याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर पसरविले.

Leopard Terror
Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

रविवारी (ता. २४) सकाळीच बिबट्याने वडजी गावात पवन भांड यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेतात धूम ठोकली. दुपारी मुरमा शिवारात दर्शन घडविले. सोमवारी (ता. २५) सकाळीच सुलतानपूर-पारुंडी रस्त्यावर बिबट्या ठाण मांडून बसला होता. राजू निसर्गे पारुंडीहून सुलतानपूरला येत असताना त्यांनी बिबट्याला पाहून गावांत माहिती दिली.

दुपारी मुरमा शिवारात कापूस वेचणाऱ्या महिलांना बिबट्या दिसल्याने त्यांनी गावात पळ काढला. त्यानंतर तासाभराने बिबट्याने हर्षी बुद्रुक शिवारात आबासाहेब मुरलीधर आगळे हे आपल्या गट नंबर २० मधील शेततळ्यात मोटार सुरू करण्यासाठी गेले असता उसातून त्यांच्या दिशेने हल्ल्याच्या उद्देशाने झेप घेतली. मात्र शेततळ्याला असलेल्या कुंपणामुळे श्री आगळे वाचले. त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या त्याच्या बछड्यासह उसाच्या पिकांत निघून गेला. त्यानंतर बिबट्याचे तासभराने थेरगाव शिवारात तुरीच्या पिकांत दर्शन झाले.

Leopard Terror
Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

यासंबंधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी बिबट्याचे ठसे व अक्षांश-रेखांशमध्ये फोटो घेऊन ते परत निघाले असता ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. दररोज बिबट्याचे मुरमा, थेरगाव, दादेगाव कोळीबोडखा, हर्षी, कुतूबखेडा, वडजी शिवारात तास-दीड तासाच्या अंतराने दर्शन होऊ लागल्याने त्याच्या धास्तीने शेतावर कुणी जाण्यास धजेना.

सर्वत्र गहू, हरभरा पेरणी सोबतच पिकांना पाणी देण्याचे व कापूस वेचणीचे सुरू असलेली कामे खोळंबली आहेत. वन विभागाने चार ठिकाणी पिंजरे बसविले असून तीन आठवड्यांपासून बिबट्या हुलकावणी देत आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वडजीचे सरपंच भाऊसाहेब गोजरे, पाचोडचे उपसरपंच नितीन वाघ, बाळूभाऊ भवरे, दत्तात्रय भवरे, बाबूतात्या गोजरे आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com