Parisanvad Program Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Management : ‘उसातील पाचट जाळू नका’

Team Agrowon

Kalamb News : ‘‘जमिनीतील कर्बाची वाढ करण्यासाठी उसातील पाचट जाळू नका,’’ असे आवाहन ऊस शास्त्रज्ञ बाळकृष्ण जमदग्नी यांनी केले.

धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगर व वेस्ट इंडियन शुगर मील्स् असोसिएशन पुणेतर्फे आवर्षणग्रस्त परिस्थितीत दर्जेदार व शाश्वत ऊस उत्पादनासाठी कारखानास्थळी सोमवारी (ता.१८) शेतकरी परिसंवाद झाला. ‘नॅचरल’चे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे अध्यक्षस्थानी होते.

जमदग्नी म्हणाले,‘‘ऊसपिकासाठी इतर खतांबरोबर संजीवकांचा वापर प्राधान्याने करावा. त्यामुळे उत्पादन वाढीस फायदा होईल.’’

श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना कार्बन क्रेडीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पाच फुटी रुंद सरी ऊस लागवड, ठिबक सिंचन सुविधा आणि खोडवा उसामधील पाचट न जाळणे या अटींची पूर्तता केल्यानंतर कार्बन क्रेडीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

ऊस जातीचे संशोधक डॉ. भरत रासकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. रासकर यांनी मागील सहा वर्षांमध्ये उसाच्या नवनवीन अशा एकूण सहा ऊस जाती प्रसारित केल्या आहेत. त्या सर्व ऊस जाती शेतकऱ्यांच्या आणि साखर कारखान्यांच्या फायद्याच्या असल्याचे सांगितले. माजी शास्त्रज्ञ बी. पी. पाटील, कारखान्याचे संचालक पांडुरंग आवाड, संचालक अनिल ठोंबरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT