Ashadhi Wari  Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा बरडला मुक्काम

Palakhi Sohala 2025 : बरड येथील मुक्कामासाठी प्रस्थान केल्यानंतर शहरात ठिकठिकाणी व शहराबाहेरील नीरा उजवा कालव्यावरील रावरामोशी पूल येथे भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.

Team Agrowon

Satara News : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने फलटणमधून सकाळी सहा वाजता प्रस्थान केले. बरड येथील मुक्कामासाठी प्रस्थान केल्यानंतर शहरात ठिकठिकाणी व शहराबाहेरील नीरा उजवा कालव्यावरील रावरामोशी पूल येथे भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. यानंतर हा सोहळा विडणी येथे न्याहरीसाठी थांबला.

विडणी येथे न्याहरी व अल्प विश्रांती घेऊन हा सोहळा दुपारच्या जेवणाकरिता पिंप्रदकडे मार्गस्थ झाला. विडणी येथे या पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच सागर अभंग, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपसरपंच मनिषा नाळे, पोलिस पाटील शीतल नेरकर, ग्रामविकास अधिकारी टेंबरे आदी मान्यवरांनी व ग्रामस्थांनी उत्साहात केले.

पिंप्रद येथे माऊलींच्या पादुकांना स्नान घालून वारीतील सर्व दिंड्यांच्या वतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. पिंप्रद येथे या सोहळ्याचे स्वागत सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराटे, सदस्य हनुमंत शिंदे, विकास ढमाळ, सुषमा धुमाळ, मंगल लावंड, प्रताप शिंदे, कल्पना शिंदे, रेशमा मोरे, शीला जाधव, ताई घनवट, पोलिस पाटील सुनील बोराटे, ग्रामसेवक महादेव बळीप यांच्या वतीने करण्यात आले.

दुपारच्या भोजनानंतर मार्गस्थ झालेला हा सोहळा सायंकाळच्या विसाव्यासाठी वाजेगाव येथे विसावला. याठिकाणी तेथील मान्यवरांचे स्वागत स्वीकारून व सुमारे अर्ध्या तासाचा विसावा घेऊन हा सोहळा बरडकडे मुक्कामाला रवाना झाला.

बरड येथील माऊलींचा मुक्काम हा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पालखी सोहळा सोमवारी (ता. ३०) दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT