Ajit Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Divyang Bhavan : प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

Ajit Pawar : राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ती या दिव्यांग आहेत. त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ती या दिव्यांग आहेत. त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल. त्याची सुरुवात विभागीय मुख्यालयांपासून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस रोहयो व फलोत्पादनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. सतीश चव्हाण,

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे सादरीकरण केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की मागणी केल्यानुसार नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानुसार सर्व मंजूर निधी खर्च करावा. निधी खर्च करण्याचा प्राधान्यक्रम ठरवा म्हणजे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

येत्या काळात पाणीपुरवठा योजना व दुष्काळी उपाययोजनांचेही नियोजन करण्यात यावे. जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपण असले पाहिजे त्यामुळे मुलांना शालेय वातावरण मिळते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरणही हाती घ्यावे. जेणे करुन ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नागरिकांना मिळायला हव्या. याच बैठकीत जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामास सुप्रमा देण्याबाबतही ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. सतीश चव्हाण यांनीही सहभाग घेतला. बैठकीचे सूत्रसंचालन अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले तर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Ban: उत्तर प्रदेशात बासमती तांदळावर परिणाम करणाऱ्या ११ कीटकनाशकांवर बंदी

Kharif Crop : नवापूरमधील संततधारेने पिकांना जीवदान

Jalgaon Rainfall : जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस

Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; सोयाबीन किंमतीत वाढ, हरभरा स्थिर, शेवगा आवक वाढली, केळीचे दर कायम

SCROLL FOR NEXT