Export India Agrowon
ॲग्रो विशेष

Export India: निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्या

Agri Export: जिल्ह्यातील निर्यात वाढून जिल्ह्याचे उत्पन्न वाढण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, अग्रणी बँक व कृषी विभाग यांनी परस्पर समन्वय साधून संबंधित यंत्रणांनी त्याची अंमलबजावणी करावी.

Team Agrowon

Sangali News: जिल्ह्यातील निर्यात वाढून जिल्ह्याचे उत्पन्न वाढण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, अग्रणी बँक व कृषी विभाग यांनी परस्पर समन्वय साधून संबंधित यंत्रणांनी त्याची अंमलबजावणी करावी. तसेच अपेडाच्या सहकार्याने तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा निर्यात प्रचालनाबाबत बैठक झाली. या वेळी माजी अप्पर मुख्य सचिव व कृषितज्ज्ञ नानासाहेब पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, डीजीएफटीचे सिद्धांत गायकवाड,

अक्षय कोकणे, ईवाय सल्लागार श्रीजित नायर, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक संजय अराणके, संचालक आनंद पाठक तसेच, दूरदृष्यप्रणालीद्वारे अपेडाचे प्रशांत वाघमारे, एफआयईओ अंकित देवळेकर उपस्थित होते.

श्री. काकडे म्हणाले, की जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवांचा आलेख वाढवण्यासाठी यासंबंधी अपेडाच्या सहकार्याने तालुकानिहाय प्रशिक्षण मेळावे आयोजित करावेत. उद्दिष्ट ठरवून नियोजन व जिल्ह्याचा धोरणात्मक कृती आराखडा तयार करून सध्याच्या निर्यातदारांशी चर्चा करावी. अपेडातर्फे आयोजित प्रदर्शनात सहभागी व्हावे.

कृषितज्ज्ञ नानासाहेब पाटील म्हणाले, की निर्यातीतील आगामी संधी व धोके ओळखून नियोजन करणे आवश्यक आहे. निर्याती बरोबर देशांतर्गत बाजारपेठेची गरजही लक्षात घ्यावी. या वेळी कृषी प्रकिया व अन्न प्रक्रियेसाठी शासनाच्या उद्योग विभागाच्या विविध योजना विविध योजनांची माहिती दिली.

या वेळी कृषी व कृषिपूरक उत्पादनांची निर्यात वाढवणे, कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातील संधी व निर्यातीची प्रक्रिया तसेच, शीतगृहे, एनएबीएस मान्यताप्राप्त प्रयोगशाळा, परीक्षण सुविधा, ड्राय पोर्ट, पॅक हाऊसेस, कोल्ड स्टोअरेज यांची उपलब्धता, निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT