Ashadhi Wari 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी सालीमठ

Pandharpur Ashadhi Wari : पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरची वाट धरतात. यावेळी देखील आषाढी वारीसाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्या निघणार आहेत. त्याच्याआधी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनास काही महत्वाचे निर्देश दिले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीमधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरची वाट धरतात. त्यामुळे सर्व मुलभूत सोयी-सुविधांचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह देखील उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश आषाढी वारीच्या नियोजनाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे प्रमुख तसेच जिल्ह्यातील अनेक दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या नगरमधून मार्गस्थ होतात. या दिंड्यामधील वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असून ती गावात अथवा शहरामध्ये थांबणार आहेत. तेथे मुक्कामाची व्यवस्था करावी. तसेच दिंडी मार्गावर शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था चोख ठेवावी.

औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा

दिंड्यामधून हजारो वारकरी पायी चालत असतात. अशा वेळी वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घेत आरोग्य पथके तैनात ठेवण्यात यावीत. आरोग्य पथकांमध्ये मनुष्यबळासह औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. गरज पडल्यास एखाद्याला रूग्णालयात हलवता यावे म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात यावी. तर प्रत्येक दिंड्यामध्ये प्रथमोपचार किट देण्यासह आरोग्य सुविधेमध्ये कोणतीही उणीव ठेवू नये अशा सूचना अरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पुरेसा पोलीस बंदोबस्त

वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वारी मार्गावर वाहतुकीचे नियमन चोख व्हावे. तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच मुक्काम ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा.

पाण्याचा निचराकरण्याची कार्यवाही

सध्या पावसाचे दिवस असून अनेक मुक्कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे असे प्रकार घडू नये म्हणून योग्य कार्यवाही करावी असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

गतवर्षी आषाढी वारीमध्ये प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, राजराजेश्वरी दिंडी प्रमुखांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार केला. तसेच सर्व दिंडी प्रमुखांनी वारकऱ्यांचा विमा काढण्यात यावा. वारकऱ्यांच्या वाहनांना पासेसचे वितरण अहमदनगर येथुन व्हावे. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्याही दिंडी प्रमुखांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT