KDCC Bank agrowon
ॲग्रो विशेष

KDCC Bank Kolhapur : जिल्हा बँक वाटणार २६ कोटींचा लाभांश, साडेसहा लाख शेतकऱ्यांना फायदा

Kolhapur Jilha Bank : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सहकारी विकास सेवा संस्थांना जिल्हा बँकेकडून लाभांश दिला जात नव्हता.

sandeep Shirguppe

KDCC Bank Farmers Scheme : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेला ८१ कोटी ७२ लाख २२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे झालेल्या नफ्यातून जिल्ह्यातील ११ हजार ९३६ सभासद संस्थांना व काही नियमात बसणाऱ्या नवीन संस्थांना २६ कोटी ८० लाख रुपयांचा लाभांश वाटप होणार आहे, याचा जिल्ह्यातील ६ लाख ५० हजार हजार संस्थांच्या सभासदांना होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा बँकेला ८१ कोटी ७२ लाख २२ हजार २३५ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यातून बँकेच्या सभासद संस्था २६ कोटी ८० लाख रुपयांचा लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव आहे. सर्वसाधारण सभेत या मंजुरी घेतली जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सहकारी विकास सेवा संस्थांना जिल्हा बँकेकडून लाभांश दिला जात नव्हता. याचा थेट फटका त्या-त्या विकास सेवा संस्थांमध्ये सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत होता. गेल्यावर्षीपासून संस्थांच्या ठेवीवर लाभांश दिला जात आहे. त्यामुळे दोन-अडीच टक्के व्याजावर काम करून तरणाऱ्या संस्थांना काही प्रमाणात का असेना उभारी मिळाली आहे.

जिल्हा बँकेच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातील बँकेकडे ११ हजार ९३६ संस्था सभासद होत्या. ६५५ व्यक्ती सभासद होते. यावर्षी ११८६ संस्था नवीन सभासद झाल्या असून, १६ संस्थांचे सभासदत्व रद्द केले आहे.

दरम्यान, संस्थांनी ठेवलेल्या ठेवींवर दहा टक्केप्रमाणे लाभांश दिला जाणार आहे. ८१ कोटी ७२ लाख २२ हजार २३५ रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या विभागणीमध्ये संस्थांना २६ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्तावित लाभांश वाटपाचे नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pond Management: राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडे?

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द झाला; अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार!

Wheat Cultivation: भरघोस उत्पादनासाठी बागायती गव्हाचे लागवड तंत्रज्ञान

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

Ativrushti Madat: परभणी, हिंगोलीकरिता ६० कोटी ७३ लाख मंजूर

SCROLL FOR NEXT