Parbhani Agriculture Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : परभणीत १४ फेब्रुवारीपासून जिल्हा कृषी महोत्सव

Parbhani Agriculture News : विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषी उत्पादन तसेच विपणनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Parbhani News : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व संजीवनी मित्र मंडळ यांच्यातर्फे परभणी येथे १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव -२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके आदी उपस्थित होते.

गावडे म्हणाले, की कृषी तंत्रज्ञानासह शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शेतकरी-शास्रज्ञ, संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी समूह, गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद-व्याख्यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे

विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषी उत्पादन तसेच विपणनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कृषी महोत्सवामध्ये शेतकरी स्टॉल, सजीव नमुने, प्रात्यक्षिके, नावीन्यपूर्ण पशु आदी मिळून दोनशे दालनांचा समावेश राहील. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांची व्याख्याने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

शेतकरी, कृषी बचत गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रिय शेतीमाल उत्पादन तयार करणारे शेतकरी, कृषी प्रक्रिया करणारे उद्योजक आदींना ६० स्टॉल मोफत विनाशुल्क देण्यात येणार आहेत.

यंदा सार्वजनिक, खासगी, भागीदारी पद्धतीने जिल्हा कृषी महोत्सव आयोजित केल्याचे गावडे म्हणाले. महोत्सवात पशु प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी फुले, फळे, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्ये आदीचे जीवंत नमुने सादर करावेत. सहभागी शेतकरी-पशुपालकांमधून पुरस्कार काढण्यात येणार आहेत. माहितीसाठी अभिषेक घोडके, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, संपर्क ९९२२५१६७१६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT