Ration Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Distribution : आनंदाचा शिधा वाटपाला आचारसंहितेचा ब्रेक्र

Code of Conduct : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्याने आगामी दोन महिने आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Team Agrowon

Jalna News : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्याने आगामी दोन महिने आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या योजनेला आचारसंहितेचा ब्रेक लागल्याने १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थींना तीन महिन्यांची (जुलैपर्यंत) प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात तीन लाख ४५ हजार पाच रेशनकार्डधारक आहेत.

राज्यातील दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना सण-उत्सव काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य नाममात्र दरात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील १५ लाख ३९ हजार ९३५ लाभार्थींना आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळत आहे. सण, उत्सव काळात आनंदाचा शिधा रेशन कार्डवर दिला जातो. हा शिधा दिवाळी, मध्यतंरी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या काळात वितरित करण्यात आला होता.

जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असे किट १०० रुपयांत गुढीपाडव्याला, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तीन महिने आनंदाचा शिधा वाटप बंद राहणार आहे. आनंदाचा शिधा मिमळण्यासाठी कार्डधारकांना जुलै महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्यातील कार्डधारक व लाभार्थी

तालुका कार्डधारक लाभार्थी संख्या

अंबड ४७,६४९ २,१४,८०३

बदनापूर ३०,८६१ १,३५,६५१

भोकरदन ५९,४१६ २,४८,५३०

घनसावंगी ४०,७७५ १,७५,८६५

जाफराबाद ३२,१९२ १,४२,३८४

जालना ७३,८१९ ३,३९,९३१

मंठा २९,०११ १,३९,१२३

परतूर ३१,२८२ १,४३,४६८

एकूण ३,४५,००५ १५,३९,९३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT