Collector's Office : जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन

Establishment of Code of Conduct Chamber : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर व शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
Collector Office Nagar
Collector Office NagarAgrowon

Nagar News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर व शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नगर व शिर्डी अशा दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाचव्या मजल्यावर अचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election२४@gmail.com या ई-मेल आयडीवर आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या तक्रारी असल्यास नागरिकांना कक्षाकडे दाखल करता येतील.

Collector Office Nagar
Amrut Maha Awas Award : ‘यशवंत पंचायत राज,’‘अमृत महाआवास’ पुरस्कार वितरण

नगर आणि शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर विधानसभा मतदार संघनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी यांची निवड केली जाते.

शेवगाव- प्रसाद मते, राहुरी- शाहूराज मोरे, पारनेर- गणेश राठोड, नगर- सुधीर पाटील, श्रीगोंदे- गौरी सावंत, कर्जत -जामखेड- नितीन पाटील, अकोले- रामदास जगताप, संगमनेर- शैलेश हिंगे, शिर्डी- माणिक आहेर, कोपरगाव- बालाजी क्षीरसागर, श्रीरामपूर- किरण सावंत, नेवासे- अरुण उंडे यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७३४ मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी व १ पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Collector Office Nagar
Electoral Bond : तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल

म्हणजे सर्व केंद्रांवर १८ हजार ६७० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. शिवाय १० टक्के कर्मचारी राखीव राहणार आहेत. मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी ७ हजारावर पोलिस अधिकारी-कर्मचारी व ४ हजारांवर होमगार्ड, केंद्रीय दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. जिल्ह्याबाहेरूनही बंदोबस्त मागविण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आलेले असून या केंद्रात १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तो २४ तास सुरू राहणार आहे. याशिवाय सी-व्हिजील पवर आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रारी मोबाइलवर करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com