Code of Conduct for Elections : यवतमाळ जिल्ह्यातील १६ हजार महिला साडीपासून वंचित

Stop Distribution of Sarees : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे साडीचे वितरण थांबविण्याचे आदेश रेशन दुकानदारांना दिले आहेत.
Election Code of Conduct
Election Code of ConductAgrowon

Yavatmal News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे साडीचे वितरण थांबविण्याचे आदेश रेशन दुकानदारांना दिले आहेत. जिल्ह्यातील दोन हजार ४१ रेशन दुकानदारांनी साड्या गुंडाळून ठेवल्या आहेत. आनंदाचा शिधाही दुकानातच पडून आहे.

अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल कार्डधारकांना शंभर रुपयांत सण, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शिधा वितरित केला जातो. या वर्षी शासनाने होळी, गुढीपाडव्यापर्यंत जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील महिलांना प्रत्येकी एक साडी वाटप करण्याचे जाहीर केले होते.

Election Code of Conduct
Election Bonds : निवडणूक रोखे : चलन अनोखे

प्राधान्य कार्डधारकांना दहा किलो क्षमतेची प्लॅस्टिकची पिशवी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उद्देशाने त्यांना साडी पिशव्यांचे वाटपही सुरू झाले होते. मात्र, आचारसंहिता लागल्याने वस्तू वाटपाला ब्रेक लागला आहे. तिन्ही वस्तू पूर्णत: गरजूंपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. या तिन्ही वस्तू मिळाल्या नाही, त्यांना आता पुढील ८० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Election Code of Conduct
Election Management : दिव्यांग, आजारी शिक्षकांना निवडणूक सेवेतून वगळा

जिल्ह्यात जवळपास तीन हजार ३१९ शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधाचे वाटप व्हायचे आहे. अंत्योदय कार्डधारक १६ हजार ४९७ कुटुंबातील सदस्यांना अद्याप साडी मिळालेली नाही. ९० टक्क्यांच्या वर दहा किलो क्षमता असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे वाटप व्हायचे आहे. दोन्ही पाकिटांवर नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाला आचारसंहिता लागल्यानंतर वाटप रोखावे लागले.

तीन हजार लोकांचा शिधा दुकानातच

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा ते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पाच लाख ८१ हजार ८४ शिधा जिन्नस वितरणासाठी आला होता. यापैकी पाच लाख ७७ हजार ७६५ व्यक्ती शिधा घेऊन गेले. तीन हजार ३१९ व्यक्ती शिधा खरेदी केला नसल्याने पडून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com