Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Shop : रेशन दुकानातून मुदतबाह्य रव्याचे वाटप

Anandacha Shidha : गरिबांचा, शेतमजुरांचा सण गोड व्हावा, यासाठी राज्य शासनाने अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा दिला.

Team Agrowon

Amaravati News : तालुक्यात या महिन्यात रेशन दुकानातून शिधावाटप सुरू आहे. या शिधावाटपामध्ये रेशन दुकानातून एक्सपायरी डेट असलेल्या रव्याचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गरिबांचा, शेतमजुरांचा सण गोड व्हावा, यासाठी राज्य शासनाने अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा दिला. मात्र, गणेशोत्सवाला मिळणारा आनंदाचा शिधा दिवाळीच्या महिन्यात तालुक्याला मिळत आहे. या आनंदाच्या शिध्यामध्ये साखर, रवा, तेल, चेनाडाळीचा समावेश आहे.

यामध्ये रव्याच्या पाकीटवर उत्पादनाची तारीख २४ ऑगस्ट असून, वापरण्यायोग्यची तारीख २३ ऑक्टोबर आहे. रेशनधारक संपूर्ण महिन्यामध्ये केव्हाही आपले धान्य उचलू शकतो, त्यामुळे संबंधित रेशन दुकानदारांचे दुकान संपूर्ण महिनाभर उघडे ठेवावे लागते. असे असताना आनंदाच्या शिधामध्ये देण्यात आलेला रवा हा तालुक्यातील काही रेशन दुकानांमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत वापरण्यायोग्य असल्याचे लेबल त्या पाकीटवर आहे.

२३ नंतरसुद्धा या रवा पॅकेटचे काही रेशन दुकानातून वाटप सुरू होते, अशी चर्चा आहे. मग ते देताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही का? असाही प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे.

मुदत उलटून गेल्यावर पॅकेटबंद असणारी वस्तू देणे किंवा विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील शासकीय दुकानांतून मुदतबाह्य वस्तू विकल्या जात असतील तर यात दोषी कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात, त्याच रेशन दुकानदाराकडे जावे लागत असल्याने, जसा लाभ मिळाला तो तसा घेऊन जातो व तक्रारही करीत नाही,

कीटमधील रव्याचे वाटप करताना त्यावरील एक्स्पायरी डेट तपासून घ्यावी व नंतरच रव्याचे वाटप करावे. कुठल्याही परिस्थितीत मुदतबाह्य झालेला रवावाटप करू नये, मुदतबाह्य झालेल्या सर्व रव्याचे डबे बाजूला ठेवावेत. त्याऐवजी नवीन डबे पाठवण्यात येणार आहेत. अशा सूचना सर्व राशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
- जितेंद्र पाटील, पुरवठा निरीक्षक अधिकारी, चांदूरबाजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Legislative Council Voter Turnout: विधान परिषदेसाठी विक्रमी मतदान

Water Dam Water Level: वीर धरणात केवळ १८ टक्के साठा

Indrayani River Pollution: इंद्रायणी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

Pune APMC: पुणे बाजार समितीकडून ‘यशवंत’ची जमीन खरेदी पूर्ण

Solar Energy Projects: शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ओढा सौरऊर्जा प्रकल्पांकडे

SCROLL FOR NEXT