PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पीएम किसानच्या १६ व्या हप्त्याचे उद्या वितरण

PM Kisan 16th Installment : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी १९४३ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी १९४३ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपयांप्रमाणे ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत.

२८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्याचे वितरण होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गाजावाजा करत तीन हप्ते एकत्र देण्यात येणार असून याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे. पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांची भर पडली असून या शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली आहे. मागील अर्थसंकल्पी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली होती.

त्यानुसार पहिला हप्ता या आधीच वितरित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यामध्ये ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ निधीचा लाभ देण्यात आला होता. यापोटी १७१२ कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. आता दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटींच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हे तिन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार आहेत.

गावोगावी साजरा होणार किसान दिवस

२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Praveen Gedam) यांनी कृषी विभागाच्या जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामाईक सुविधा केंद्र येथेही पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT