Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सातारा जिल्ह्यात १०२ टक्के पीककर्जाचे वितरण

Rabi Crop Loan : सातारा जिल्ह्यात खरीप व रब्बी पीक कर्ज वितरण १०२ टक्के झाले असून, यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सर्वाधिक ११७ टक्के कर्ज वितरण आघाडी कायम ठेवली आहे.

Team Agrowon

Crop Laon Satara News : सातारा जिल्ह्यात खरीप व रब्बी पीक कर्ज वितरण १०२ टक्के झाले असून, यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सर्वाधिक ११७ टक्के कर्ज वितरण आघाडी कायम ठेवली आहे. तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी ७९ टक्के कर्ज वितरण केले आहे. तसेच २०२३-२४ या वर्षासाठी तीन हजार कोटी रुपयांचे उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.

खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर, तर रब्बी हंगामातासाठी ऑक्टोबर ते मार्च अखेर कर्जवाटप केले जाते. खरीप व रब्बी हंगामासाठी बँकांना २८०० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकांनी ३,७५,३७२ शेतकऱ्यांना २८६६ कोटी ४५ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. सर्व बँकांनी मिळून १०२ टक्के पीक कर्जाचे वितरण केले आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बँकेचा वाटा आहे.

जिल्हा बँकेस १७११ कोटीचे उद्दिष्टे देण्यात आली होती. या बँकेने ३,२८,८१९ शेतकऱ्यांना २००२ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ११७ टक्के वाटप केले आहे.

तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांना १०८९ कोटी रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यापैकी या बँकांनी ४६,५५३ शेतकऱ्यांना ८६३ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यातील अनेक बँकांनी कर्ज वितरणाकडे लक्ष दिले नसल्यामुळे ७९ टक्के उद्दिष्टे गाठता आले आहे.

राष्ट्रीयकृत व खासगी बँकाचे सातत्याने शेतकऱ्यांना कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सिबिल खराब असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याचे आदेश दिले असले तरी बँका या आदेशाकडे दुर्लक्ष केले जाते. या बँकावर कारवाई होत नसल्यामुळे कर्ज वितरण करणाऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही.

आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी ३००० कोटी रुपयांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेस १८३५ कोटी उद्दिष्टे दिली असून यामध्ये खरिपात १२८५ कोटी, तर ५५० कोटी उद्दिष्टे देण्यात आले आहे. तर इतर बँकांना ११६५ कोटी दिसून यापैकी खरिपासाठी ८१५ कोटी तर रब्बी३५०कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्या खरीप हंगामातील कर्ज वितरण सुरू झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT