Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Disease : अवकाळीमुळे हरभरा पिकावर मर रोग

Chana Crop Damage : मॉन्सुनोत्तर पाऊस व धुक्यामुळे हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

Sahada News : मॉन्सुनोत्तर पाऊस व धुक्यामुळे हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्रातील हरभऱ्याचे कोवळे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे.

खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीनचे उत्पादन अपुऱ्या पावसामुळे घटले. शेतकऱ्यांना या पिकांमधून उत्पादन खर्च देखील निघाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने रब्बीच्या हरभरा, गहू, पिकांची पेरणी केली. मात्र अस्मानी संकटामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

अवकाळी पाऊस व धुक्यामुळे पिकांना मोठा फटका बसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.मॉन्सुनोत्तर आणि ढगाळ वातावरणामुळे काही शेतकऱ्यांची हरभरा पीक जळून नष्ट होत आहेत. काही दिवस वातावरण असेच राहिल्यास शेतकऱ्यांच्या हाती निराशा येणार असल्याचेशेतकऱ्यांनी सांगितले.

दुबार पेरणीचे संकट

शहादा तालुक्यातील शेकडो एकर हरभरा पीक अवकाळी पावसाने बाधित होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तर काही क्षेत्रात दुपार पेरणी ओढवण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. माझी कळंबू शिवारातील शेतातील निम्मी रोपे जळून जात आहेत.
- ऋषीकेश बोरसे, शेतकरी, कळंबू
हरभरा पेरणी केली आहे. मात्र, अवकाळी पाऊस व धुक्यामुळे झाडे जळून गेली. बाधित झाडे स्वतः उपटून नष्ट केली. मात्र, महागडे बी वाया जाऊन मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
-प्रशांत देवरे, शेतकरी, कळंबू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT