Team Agrowon
सध्या हरभरा पीकवाढीच्या तसेच फुलोरा लागण्याच्या अवस्थेत आहे. ता. २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हरभरा पिकांमध्ये पाणी साचून राहिले.
मागील आठवडाभरात मर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला आहे. या दोन जिल्ह्यांतील हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे उभे पीक पिवळे पडून वाळून गेले.
पीक विरळ झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हरभरा पीक मोडून टाकावा लागला. त्यानंतर दुबार पेरणी केली. परंतु त्यानंतरही अनेक भागांत मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
अनेक भागांत पीक पाण्याखाली गेले. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत होता.
ऑक्टोबर महिन्यात जमीन भिजवून हरभऱ्याची पेरणी केली. परंतु जोरदार पावसानंतर मर लागली. त्यामुळे सात ते आठ एकर हरभरा मोडून दुबार पेरणी केली.
वाढीच्या अवस्थेतील चार एकर हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिवळे पडलेले विरळ झालेले पीक मोडून टाकले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.