Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Market Committee Election Update : उमेदवारीवरून पॅनेलमध्ये सुंदोपसुंदी पात्रता असलेल्यांना डावलल्याची चर्चा

जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत जळगावात युती व आघाडीचे पॅनेल गठित झाले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत (Election of Jalgaon Market Committee) जळगावात युती व आघाडीचे पॅनेल गठित झाले आहेत. त्यात जातीय समीकरणे व उमेदवारी देताना पात्रता, क्षमता लक्षात घेतलेली नसल्याचा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच अनेकांना डावलण्याचा प्रकार झाल्याचे दिसत आहे.

युतीचे सहकार पॅनल तयार झाले आहे. यात अनेक नवखे आहेत. त्यांना तालुक्यात कुणी ओळखत नाही. फक्त निधी आणण्याची कुवत पाहिली, अशी टीका जाणकार करीत आहेत. युतीमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेले वसंत भालेराव, विजय दत्तात्रेय पाटील यांना डावलण्यात आले आहे.

युतीच्या पॅनेलमध्ये जातीय समीकरणांत कुणबी पाटील किंवा मराठा आणि लेवा पाटीदार समाजातील उमेदवारांची संख्या व्यवस्थित राखण्यात आली आहे. पण भाजपने पॅनेलमध्ये उमेदवार देताना कुण्याही गुर्जर समाजाच्या प्रतिनिधीला स्थान दिलेले नसल्याची टीका केली जात आहे.

भाजपने प्रभाकर सोनवणे, राजेश सुर्वे, मीनाबाई पाटील, समाधान धनगर, मनोहर पाटील व मिलिंद चौधरी यांना स्थान दिले आहे. तर सेनेने रामचंद्र पाटील, जितेंद्र पाटील, अनिल भोळे, सुरेश पाटील, सुभाष महाजन, हेमलता नारखेडे, राजेंद्र चव्हाण ललिता कोळी, पंकज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

यात मराठा व लेवा पाटीदार आणि कोळी समाजाची मते साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु उमेदवारांमधील काही चेहरे तालुक्यातील राजकारणात नवे आहेत. काहींना आपल्या समाजातीलच मंडळी ओळखत नाही, अशी स्थिती आहे.

समाधान धनगर यांना युतीमध्ये संधी मिळाली, परंतु या मतदार संघात किंवा त्यांच्यासमोर गुलाबराव पाटील समर्थक वसंत भालेराव यांची उमेदवारी कायम आहे. यामुळे या जागेवर काट्यांची लढत होईल आणि युतीच्या पॅनेलची डोकेदुखी वाढेल, असे दिसत आहे.

आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलने मराठा किंवा कुणबी पाटील समाजातील जयराज चव्हाण, पांडुरंग पाटील, साधना पाटील, वैशाली चव्हाण, अरुण पाटील यांना संधी दिली आहे.

तर लेवा पाटीदार समाजातील लीना महाजन, सूरज नारखेडे, मनोज चौधरी, सुनील महाजन यांना संधी मिळाली आहे. गुर्जर समाजातील लक्ष्मण पाटील, ईश्‍वर पाटील आणि संदीप पाटील हे तीन उमेदवार या पॅनेलने देऊन गुर्जर मतदार साधण्याचा प्रयत्न केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Heavy Rainfall: मराठवाड्यात पिके पाण्याखाली; पावसाचा जोर कायम

Beed Flood Accident: पुरात वाहून गेलेले तिघे बचावले, एकाचा मृत्यू

Maharashtra State Cooperative Union: राज्य सहकारी संघ अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर बिनविरोध

Chhagan Bhujbal: शेतकऱ्यांमुळे राष्ट्राची प्रगती

Farmers Protest: भाकड पशुधनप्रश्नी आंदोलन करणार

SCROLL FOR NEXT